Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे जाणून घ्या
१.मुंबई महापालिकेचा २०२४-२५ चा ५९ हजार ९५४ कोटी ७५ लाख रुपयाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. २०२३-२४ मध्ये ५४ हजार २५६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प होता. यंदा त्यात १०.५० टक्के वाढ झाली. २०२४-२५ आर्थिक वर्षाकरिता अंदाजित महसुली उत्पन्न ३५,७४९.०३ कोटी कोटी रुपये प्रास्तावित केले असून २०२३-२४ च्या तुलनेत २ हजार ४५९ कोटीने जास्त आहे
२. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये ₹२८६९३.३० कोटी इतके प्रत्यक्ष महसूली उत्पन्न प्राप्त झाले होते. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे महसूली उत्पन्नाचे अर्थसंकल्पीय अंदाज ₹३३२९०.०३ कोटी एवढे प्रस्ताविण्यात आले होते, ते ₹३२८९७.६८ कोटी असे सुधारण्यात आले असून अंदाजामध्ये ₹३९२.३५ कोटी इतकी घट झाली आहे. दिनांक ३१.१२.२०२३ पर्यंत ₹१९२३१.५५ कोटी इतके प्रत्यक्ष उत्पन्न प्राप्त झाले आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता अंदाजित महसूली उत्पन्न ₹३५७४९.०३ कोटी इतके प्रस्ताविले असून ते सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या तुलनेत ₹२४५९ कोटीने जास्त आहे.
३. जकातीपोटी नुकसान भरपाई म्हणून मिळणारे अनुदान ₹१३३३१.६३ कोटी, मालमत्ता करापोटी मिळणारे उत्पन्न ₹४९५० कोटी, विकास नियोजन खात्याकडून प्राप्त होणारे उत्पन्न ₹५८०० कोटी, गुंतवणूकीवरील व्याजापोटी मिळणारे उत्पन्न ₹२२०६.३० कोटी व जल आणि मलनिःसारण आकारापोटी मिळणारे उत्पन्न ₹१९२३.१९ कोटी हे सन २०२४-२५ मधील अंदाजित उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत आहेत.
४. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये सन २०१९-२० प्रमाणेच मालमत्ता कराची वसूली करण्यात आली असून मालमत्ता करापोटी ₹४९९४.१५ कोटी इतके प्रत्यक्ष उत्पन्न प्राप्त झाले आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये, मालमत्ता करापोटी ₹६००० कोटी इतके उत्पन्न अंदाजिले होते, ते ₹४५०० कोटी असे सुधारीत करण्यात आले असून त्यामध्ये ₹१५०० कोटी इतकी घट झाली आहे.
५. भांडवली मुल्याधारीत करप्रणाली विरोधात उच्च न्यायालयात दाखल याचिका क्र.२५९२/२०१३ अंतर्गत पारित केलेल्या अंतिम निर्णयाविरोधात बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे मान. सर्वोच्च न्यायालयात याचिका क्र. १७००९/२०१९ दाखल करण्यात आली होती. सदर याचिकेअंतर्गत अंतिम आदेश बृहन्मुंबई महानगरपालिकेविरोधात पारित झाले आहेत. मान. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, भांडवली मूल्य निश्चिती नियम २०१० व २०१५ मधील नियम क्र. २०, २१ व २२ रद्दबातल ठरविण्यात आलेले आहेत. परिणामी, मालमत्ता कर वसूलीच्या कारवाईवर मर्यादा आल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेस मालमत्ता करातून मिळणाऱ्या उत्पन्नात घट झालेली आहे.
६.मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्पासाठी २०२४-२५ अर्थसंकल्पीय अंदाजात २ हजार ९०० कोटीची तरतूद प्रास्तावित करण्यात आली आहे. गेल्या अर्थसंकल्पात ३ हजार कोटी तरतूद होती. बेस्ट उपक्रमास २०२४-२५ मध्ये अनुदान म्हणून ८०० कोटी रुपये तरतूद प्रास्तावित करण्यात आली आहे
७. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील शून्य प्रिस्क्रिप्शन धोरण राबवण्यात येणार शून्य प्रिस्क्रिप्शन धोरणासाठी अभ्यासगटाची स्थापना,अत्यावश्यक नसलेली औषधे वगळून उर्वरित सर्व औषधे रुग्णालयाकडून उपलब्ध करण्यासाठी आवश्यक औषधांचा अनुसूचीमध्ये समावेश करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
८. २०२४-२५ मध्ये सुमारे २०९ किमी रस्त्यांची सुधारणा करून सिमेंट काँक्रिटीकरण करणार.. आतापर्यंत १२२४ किमी रस्त्यांचे काँक्रिटीकरणं झाले आहे. ३९७ किमी रस्त्याचे काँक्रिटीकरणंसाठी पाच निविदा मागवून कार्यादेश देण्यात आले आहेत. त्यापैकी चार कामे प्रगतीपथावर
मुंबई शहरातील जुन्या गाड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी नवीन स्क्रॅपयार्ड विकसित करण्याचे काम नियोजित असून येत्या काही दिवसात जागतिक निविदा काढली जाणार आहे
९. महसुली खर्च
सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये, महसुली खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज ₹२५३०५.९४ कोटी वरुन ₹२४६३३.३४ कोटी असे सुधारीत करण्यात आले आहेत. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये महसुली खर्चाकरीता ₹२८१२१.९४ कोटी इतके अर्थसंकल्पीय अंदाज प्रस्ताविण्यात आले आहेत.
१०. भांडवली खर्च
सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये, भांडवली खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज ₹२८८८४.८० कोटी वरुन ₹२५३१५.८१ कोटी असे सुधारीत करण्यात आले आहेत. माहे डिसेंबर २०२३ पर्यंत झालेला प्रत्यक्ष भांडवली खर्च ₹१०३४३.३८ कोटी असून तो सन २०२३-२४ च्या सुधारित अंदाजाच्या तुलनेत ४०.८६% आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये भांडवली खर्चाकरीता ₹३१७७४.५९ कोटी इतके अर्थसंकल्पीय अंदाज प्रस्ताविण्यात आले आहेत.
Read Latest Maharashtra News And Marathi News