Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आता बस झालं… मला घराणेशाही चालणार नाही, असं मोदींनी सुनील तटकरेंना सांगावं – उद्धव ठाकरे

10

रायगड: आम्हाला घराणेशाही आता नको असं सांगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार सुनील तटकरे यांना सांगायचं आता बस झालं, तुम्ही घरी बसा. आम्हाला तुमची घराणेशाही नको. काय चाललं आहे तुमचं. वडील खासदार, मुलगी मंत्री, भाऊ आमदार. आता बस झालं… मला घराणेशाही चालणार नाही. पंतप्रधान उत्तम मराठी बोलतात. त्यांनी हे तटकरेंना सांगावं, असं थेट आव्हान देत घराणेशाहीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदार सुनील तटकरे यांनी मला उत्तर द्यावं, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला आहे.

नितीश कुमार गेल्यानंतर आता उद्धव ठाकरे जाणार अशी चर्चा ऐकली होती. पण कशासाठी जाणार? मी गेले २५-३० वर्षे अनुभवला आहे. पाठ फिरवल्यानंतर वार करण्याची संधी भाजप सोडत नाही हा इतिहास जुना आहे. मनोहर जोशी विरोधी पक्ष नेते असताना भुजबळ यांनी शिवसेना सोडली. त्यावेळेला शिवसेनेला न विचारता संख्या त्यांची वाढली म्हणून सुधाकर नाईक यांनी गोपीनाथ मुंडेंना विरोधी पक्ष नेते पदावर बसवलं. इथपासून हा इतिहास सुरू होतो, असं सांगत भाजपबरोबरचा सगळा इतिहासच ठाकरे यांनी सांगितला.
तुमच्या पाठीमागे बाळासाहेब उभे राहिले हे विसरू नका, उद्धव ठाकरेंनी मोदींना ‘इतिहास’ सांगितला
ते पुढे म्हणाले की, इथल्या गद्दार खासदारांना प्रश्न पडलाय की आता उद्धव ठाकरे फिरत आहेत. गर्दी किती जमेल पण याला काय म्हणायचं? हे तुम्ही ठरवा. पण या जमलेल्या गर्दीच्या निमित्ताने मला आता शिवसेनेच्या पहिल्या दसऱ्या मेळाव्याची आठवण आली. १०६६ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी पहिली सभा ही शिवतीर्थावर घेतली. त्यावेळेला शिवाजी पार्क ओसंडून वाहत होतं, अशी भावनिक आठवण सांगत त्यांनी भगवद्गीते मधील गीतेचा सारांश सांगत धर्मविरुद्ध अधर्म असं जेव्हा युद्ध होतं, त्यावेळेला धर्माचे लोक धर्मासाठी लढायला उभे असतात. ते आपले आणि अधर्माच्या बाजूने उभे असतात. ते भले नातेवाईक असतील तरी ते आपले दुश्मन त्यांचा वध हा करायलाच पाहिजे. असा या गीतेचा अर्थ आहे आणि आता मी सुद्धा लढतो आहे. तो माझ्यासाठी नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, अनेक लोक खुर्चीसाठी वेडे असतात. खुर्ची स्वप्नात दिसते. खुर्चीसाठी वेडे होतात. अनेक वेडे असे असतात की आज मंत्री होईल, उद्या मंत्री होईल म्हणून जॅकेट शिवतात. नॅपकिन नवीन घेतात. हे पालकमंत्री नको म्हणून नाराजी व्यक्त करतात. अरे पुन्हा त्याच पालकमंत्र्यांना डोक्यावर घेऊन घाम पुसत त्यांना फिरावे लागतं, असा टोला त्यांनी पुन्हा आमदार भरत गोगावले यांना लगावला आहे.

भ्रष्टाचारी भाजपात घेतायत, सगळे पक्ष भ्रष्टाचार मुक्त झाले; ठाकरे मोदींवर बरसले

मला मुख्यमंत्री पदाच्या खुर्च्यावरून उतरवलं. पण शिवसेनेला पूर्वजांचा मुलगा जर का पदावर बसला तर घराणेशाही या घराणेशाहीवर मी बोलणारच आहे. पंतप्रधान बोलून गेले की आम्हाला घराणेशाही नको आहे. याचा आनंद आहे मी त्यांचे स्वागत केलं. पण मी परवा कल्याण मतदारसंघात असताना कल्याणचा खासदार कोण छोटा गद्दार आणि त्याचे वडील कोण मोठा गद्दार, असं सांगत तुम्हाला गद्दारांची घराणेशाही चालते का? असा सवाल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपस्थित केला. मुंबईत १९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील सागरी महामार्गाच्या पुलाच्या उद्घाटनासाठी येत आहेत. पण हा मार्ग पूर्ण झाला आहे का पहा. हे सगळे टोलभैरव आहेत, अशीही टीका त्यांनी सरकारवर केली आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.