Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

धुळे पोलिसांनी उधळला दरोडेखोरांचा सशस्र दरोड्याचा डाव….

7

दरोड्याच्या तयारीतील गुन्हेगारांना धुळे एलसीबीने केली अटक…

धुळे (प्रतिनिधी) – दरोडा टाकण्याच्या उद्देशाने पुर्ण तयारीनिशी जाणाऱ्या गुन्हेगारांना धुळे एलसीबीने शिताफीने अटक केली आहे. या मध्ये त्यांच्याकडून १ लाख ३४ हजार रु. किमतीचे दरोड्याचे साहित्य हे जप्त केले आहे. सदरची कारवाई ही श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक आणि किशोर काळे अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली (एलसीबी) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.०४फेब्रुवारी) रोजी मध्यरात्री पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांना गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीलायक माहिती मिळाली की, मोहाडी पोलिस ठाणे हद्दीतील गरताड वारीमध्ये एक सरांयीत अल्टो वाहन व ५ इसम उभे आहेत अशी माहिती प्राप्त झाल्याने पोनि. दत्तात्रय शिंदे यांनी लागलीच स्थागुशा धुळे येथील पथकास सदर ठिकाणी रवाना केले.

स्थागुशाचे पथक लागलीच गरताड बारी मध्ये गेले असता, मारूती कंपनीची एम.एच.१५ बी.डी.५८३१ क्रमांकाची अल्टो कारजवळ ४ इसम उभे दिसल्याने पथक त्यांचेजवळ गेले असता, सदर इसम पोलिस वाहन आल्याचे पाहुन गरताड बारी मधील जंगलात अंधाराचा फायदा घेवुन पळून गेले, पथकाने कारमध्ये बसलेल्या इसमास ताब्यात घेवुन त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव विधी संघर्षीत बालक रा. दंडेवाला बावा नगर, मोहाडी असे सांगितले. सदर कारची तपासणी केली असता कारमध्ये चोरी, घरफोडी व दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहीत्य मिळुन आले त्याचे वर्णन खालील प्रमाणे,

२५,०००/- रु. कि.चा एक गावटी बनावटीचे पिस्तुल, २०००/- रु.कि.चे दोन जिवंत काडतुस, ५०००/- रु.कि.ची टपारीया कंपनीची निळया रंगाची काळी मुठ असलेले कटर ०२ नग, २५०/-रु.कि.चा जॉन्सन कंपनीचा हिरव्या रंगाची मुठ असलेला स्कु-ड्रायव्हर, २००/- रु.कि.चा युनिटेक कंपनीचा हिरव्या रंगाची मुठ असलेला स्क्रू ड्रायव्हर, २००/- रु.कि.ची ॲपल गोल्ड कंपनीची निळया रंगाची मुठ असलेली पकड, १००/- रु.कि.ची लोखंडी टॅमी ०२ नग प्रत्येकी किं. १००/- रु.प्रमाणे, १००/- रु.कि.चे कात्रीचे दोन भागात विभाजन केलेले ०६ नग पिवळया व लाल रंगाचे मुठ असलेली, १००/- रु.कि.ची काळया-निळया रंगाची नाईकी कंपनीची बॅग, १०/- रु.कि.ची मिरचीची पूड अंदाजे १०० ग्रॅम वजनाची, ९००/- रु.कि.ची पांढऱ्या रंगाचे १० लिटर क्षमतेची पेट्रोल कॅन त्यामध्ये ८ लिटर पेट्रोल, आणि १००,०००/- रु.कि.ची मारुती सुझुकी कंपनीची अल्टो कार क्रमांक एम.एच. १५ बी.डी. ५८३१ असा एकूण जवळपास १,३४,०१०/- रु. मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे.

विधी संघर्ष बालक यास मिळुन आलेल्या मुद्येमालाबाबत व पळुन गेलेल्या इसमाबाबत विचारपुस करता त्याने यापुर्वी केलेल्या गुन्हयांच्या हकीकतसह पळुन गेलेल्या त्याच्या साथीदारांची नावे २) वरुणसिंग टाक रा. दाहोद, गुजराथ (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) ३) मुकुंदर जुनी रा. नदीजवळ, नंदुरबार (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) ४) आकाश मांग रा.नदी जवळ, नंदुरबार (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) ५) वरुणसिंग टाक याचा मित्र (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) असे सांगुन त्यांचे सोबत गुन्हे करीत असल्याचे सांगितले.

पंचासमक्ष विधी संघर्षीत बालक यास विचारपुस करता, त्याने त्याचे वरील साथीदारांसह (दि.३१जानेवारी) रोजी कोळगाव ता.भडगाव येथुन वॅगनर कार चोरी केल्याचे सांगितले. सदर कार घेऊन गोंडगाव ता.भडगाव येथे दि.०१फेब्रुवारी व ०२फेब्रुवारी रोजीचे दरम्यान रात्री मेडीकल दुकानातुन रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिली. सदरची चोरी करुन वॅगनर कारने जात असतांना भऊर ता.चाळीसगाव गावाजवळ कारचे पेट्रोल संपल्याने सदर वॅगनर कार तेथेच सोडुन बहाळ गावातुन अल्टो कार चोरी केल्याचे सांगितले. विधी संघर्षीत बालक यास विश्वासात घेऊन अधिक विचारपुस केली असता, त्याने व त्याचे इतर साथीदारांनी ऑक्टो २०२३ महीन्यात साक्री तालुक्यातील कावठी गावात, डिसेंबर २०२३ महीन्यात साक्री तालुक्यातील दिघाचे गावात, धुळे शहरातील बुशरा कॉलनीत व जानेवारी २०२४ महीन्यात अनुक्रमे कासारे, छडवेल पखरुण व किरवाडे गावात चोच्या केल्या असल्याचे सांगितले.

(दि.०४फेब्रुवारी) रोजी मध्यरात्री विधी संघर्षीत बालक व त्याचे वरील साथीदारांसह कसगाय ता.भडगाय, जि.जळगाव येथे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने बहाळ येथुन चोरी केलेल्या अल्टो कारने दरोडा टाकण्याकामी उपयोगी येणाऱ्या वरील साहीत्यासह गरताड बारीमध्ये मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द मोहाडी नगर पोलीस ठाणे येथे भादंक कलम ३९९, ३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधी संघर्षीत बालक याने त्याचे वरील साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिली आहे.

अशा प्रकारे सदरची कारवाई ही श्रीकांत धिवरे, पोलिस अधीक्षक, किशोर काळे, अपर पोलिस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे स्थागुशा, बाळासाहेब सुर्यवंशी,संजय पाटील, शाम निकम, दिलीप खोंडे, मच्छिंद्र पाटील, संदीप साहेबराव पाटील, संदीप सरग, हेमंत बोरसे, योगेश चव्हाण, संतोष हिरे, संदीप पाटील, प्रल्हाद वाघ, अशोक पाटील, प्रकाश सोनार, तुषार सुर्यवंशी, देवेंद्र ठाकुर, योगेश साळवे, गुणवंत पाटील, हर्षल चौधरी, नितिन मोहणे, जगदीश सुर्यवंशी, सुशिल शेंडे, कमलेश सुर्यवंशी, निलेश पोतदार, राजीव गिते, कैलास महाजन यांनी केली आहे.

The post धुळे पोलिसांनी उधळला दरोडेखोरांचा सशस्र दरोड्याचा डाव…. appeared first on Policekaka Crime Beat News 24X7.

Leave A Reply

Your email address will not be published.