Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

anna dange on sakinaka rape case नराधम मोहन चौहाणला फाशी ऐवजी अत्यंत तीव्र वेदनादायी शिक्षा द्यावी: माजी मंत्री अण्णा डांगे यांची मागणी

8

हायलाइट्स:

  • माजी मंत्री अण्णा डांगे यांनी व्यक्त केले साकीनाका बलात्कार प्रकरणी मत.
  • अत्याचार करणाऱ्या नराधम मोहन चौहाणला फाशीची शिक्षा कमी पडेल- अण्णा डांगे
  • त्याने मुलीवर अत्याचार करून वेदना दिल्या त्यापेक्षा अधिक वेदनादायी शिक्षा त्याला द्यावी- अण्णा डांगे.

अहमदनगर: मुंबई उपनगरात साकीनाका परिसरातील बलात्काराची घटना मन बधीर करणारी आहे. अत्याचार करणाऱ्या नराधम मोहन चौहाणला फाशीची शिक्षा नको. त्याने ज्या प्रमाणे मुलीवर अत्याचार करून वेदना दिल्या. त्यापेक्षा अधिक वेदनादायी शिक्षा द्यावी अशी चमत्कारिक मागणी राज्याचे माजी मंत्री श
अण्णा डांगे यांनी केली आहे. (Former minister Anna Dange has said that Mohan Chauhan should be given a very painful punishment instead of hanging)

ते म्हणाले , पाशवी अत्याचार करणाऱ्या चौहाणला फाशी द्या अशी सर्वत्र मागणी होत आहे. पण नुसती फाशी देऊन चालणार नाही. कारण आधुनिक फाशीमध्ये संबंधीतास नगण्य वेदना होत असतात. त्या काही सेकंदा पुरत्या असतात. आपण कधीतरी मरणारचं आहोत. या भावनेने पुन्हा पुन्हा असे कृत्य घडते. ही विकृती हद्दपार करण्यासाठी कडक शिक्षा असायलाचं हवी.

क्लिक करा आणि वाचा- सुनेचा शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी आमदार पी.एन. पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबईत चौहाण सारख्या नराधमाने बलात्कारित मुलीबरोबर अघोरी शारीरिक अत्याचार केले यामुळे “त्या” मुलीला झालेल्या वेदना काय असतील याचे कल्पनाही करू शकत नाही. तिच्या वेदना त्या नराधमास कशा समजणार ? म्हणून “त्या” नराधमाला त्यापेक्षाही दसपटीने तीव्र वेदना होणारी शिक्षा द्यायला हवी.

क्लिक करा आणि वाचा- शरद पवार यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे: बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

बलात्काऱ्यांना अशा शिक्षा होऊ लागल्या तरच महिलांच्या वरील अत्याचाराच्या घटना कमी होतील, असेही डांगे म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- ‘उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस’; सोमय्यांचा प्रहार

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.