Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

फक्त तीन दिवस आहे ऑफर; १६जीबी रॅम असलेला स्वदेशी ५जी फोन मिळतोय खूप स्वस्तात

11

१२ हजार रुपयांच्या रेंजमध्ये दमदार परफॉर्मन्स असलेला स्मार्टफोन शोधत असाल तर अ‍ॅमेझॉनच्या लावा डेज सेल तुमच्यासाठी आहे. १० फेब्रुवारी पर्यंत सुरु असलेल्या या सेलमध्ये तुम्ही १६जीबी पर्यंतच्या रॅम (८जीबी रियल+८जीबी व्हर्च्युअल) असलेला शानदार स्मार्टफोन- Lava Storm 5G बंपर डिस्काउंटसह विकत घेता येईल. सेलमध्ये हा फोन १२,९९९ रुपयांना मिळत आहे. १० फेब्रुवारी पर्यंत तुम्ही हा फोन बँक ऑफरमध्ये १ हजार रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल.

Lava Storm 5G Offer

एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन ११,७०० रुपयांपर्यंत आणखी स्वस्त होऊ शकतो. लक्षात घ्या की एक्सचेंज ऑफरमध्ये मिळणारा डिस्काउंट तुमच्या जुन्या फोनच्या कंडीशन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीवर अवलंबून असेल. लावा स्टॉर्म 5G तुम्ही ६३० रुपयांच्या ईएमआयवर देखील विकत घेऊ शकता.

Lava Storm 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

फोनमध्ये १०८०x२४६० पिक्सल रिजोल्यूशनसह ६.७८ इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये ऑफर केला जाणारा हा डिस्प्ले १२०हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तुम्हाला या फोनमध्ये ८जीबी रियल रॅमसह ८जीबी पर्यंतच्या व्हर्च्युअल रॅम देखील मिळेल. त्यामुळे फोनचा एकूण रॅम वाढून १६जीबी पर्यंत जाईल. फोनला इंटरनल स्टोरेज १२८जीबी आहे. प्रोसेसरच्या जागी कंपनी या फोनमध्ये Mali G57 MP 2 GPU सह मीडियाटेक डायमेन्सिटी ६०८० चिपसेट देऊ शकते.

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे एलईडी फ्लॅशसह ५० मेगापिक्सलचा मेन आणि ८ मेगापिक्सलचा एक अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स देण्यात आली आहे. तसेच, सेल्फीसाठी फोनमध्ये तुम्हाला स्क्रीन फ्लॅशसह १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह या फोनमध्ये देण्यात आलेली बॅटरी ५०००एमएएचची आहे. ही बॅटरी ३३ वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ओएस पाहता फोन अँड्रॉइड १३ वर चालतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात 5G, 4G VoLTE, वाय-फाय, ब्लूटूथ ५.०, यूएसबी टाइप-C पोर्ट आणि ३.५mm हेडफोन जॅक सारखे ऑप्शन देण्यात आले आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.