Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

येतोय जगातील सर्वात मोठी बॅटरी असलेला फोन; ‘या’ मोबाइलमध्ये असेल 28000mAh Battery

4

मोठी बॅटरी असलेला फोन म्हटलं की बऱ्याचदा ५ ते ६ हजार एमएएचची बॅटरी त्यात असेल असं म्हटलं जातं. काही स्मार्टफोन ७०००एमएएच सह देखील येतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का लवकरच बाजारात एक असा मोबाइल लाँच होणार आहे ज्यात 28000mAh Battery मिळेल. येत्या २६ फेब्रुवारीला हा फोन ग्राहकांच्या भेटीला येईल. जो जगातील सर्वात मोठी बॅटरी असलेला स्मार्टफोन ठरेल. याचे नाव आणि ब्रँडची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

28000mAh Battery असलेला फोन

सर्वप्रथम एवढी अवाढव्य बॅटरी असलेल्या फोनचे नाव जाणून घेऊया. २८,०००एमएएचची राक्षसी बॅटरी असलेल्या स्मार्टफोनचे नाव Energizer P28K असेल. फोनच्या नावातील पी२८के म्हणजे २८ हजारांची पावर असा आहे. हा मोबाइल Energizer ब्रँड द्वारे लाँच केला जाईल. विशेष म्हणजे कंपनीनं याआधी देखील असे मोठी बॅटरी असलेले मोबाइल फोन टेक मंचावर सादर केले आहेत. विशेष म्हणजे कंपनीनं काही वर्षांपूर्वी १८०००एमएएचची बॅटरी असलेला फोन लाँच केला होता ज्याचे नाव Energizer P18K असं होतं.

कधी लाँच होईल Energizer P28K

कंपनीनं अधिकृत घोषणा केली आहे की या महिन्याच्या अखेरीस म्हणजे फेब्रुवारीच्या शेवटी आयोजित होणाऱ्या मोबाइल वर्ल्ड कांग्रेस (Mobile World Congress 2024) मध्ये सहभाग घेणार आहे. Energizer P28K स्मार्टफोन २६ फेब्रुवारीला MWC 2024 मध्ये लाँच होईल. हा ब्रँड भारतात उपलब्ध नाही त्यामुळे एनर्जाइजर पी२८के स्मार्टफोन भारतात लाँच केला जाणार नाही. तुम्हाला हा फोन आयात करूनच वापरता येईल.

Energizer P28K चे स्पेसिफिकेशन्स

मोठ्या बॅटरीसह हा मोबाइल फोन मोठी स्क्रीन आणि पावरफुल कॅमेरा अश्या फीचर्ससह देखील येतो. मिळालेल्या माहितीनुसार एनर्जाइजर पी२८के मध्ये ६.७८ इंचाचा डिस्प्ले मिळेल जो फुलएचडी पिक्सल रिजोल्यूशनवर चालेल. फोटोग्राफीसाठी हा फोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. रिपोर्टनुसार याच्या बॅक पॅनलवर ६० मेगापिक्सल मेन सेन्सर तसेच २० मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स दिली जाईल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Energizer P28K मध्ये १६ मेगापिक्सल फ्रंट दिला जाऊ शकतो.

सिद्धेश जाधव यांच्याविषयी

सिद्धेश जाधव

सिद्धेश जाधव जवळपास 6 वर्ष डिजिटल मीडियामध्ये टेक्नोलॉजी विषयी लिहीत आहे. सुरुवातीपासूनच टेक विषयी माहिती वाचकांना समजेल अशा सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. कामाव्यतिरिक्त सिद्धेशला प्रवास करायाला आवडतं. नेहमीच तो वेगवेगळ्या गड किल्ल्यांवर आणि ऐतिहासिक ठिकाणी फिरत असतो. फावल्या वेळात त्याला चित्रपट बघायला आवडतात. कधीकधी तो आपल्या भावना आणि विचार चारोळ्यांच्या माध्यमातून व्यक्त करतो.… Read More

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.