Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- पारनेरच्या तहसीलदार देवरे यांची अखेर बदली.
- नीलेश लंके यांच्यावर केला होता गंभीर आरोप.
- ऑडिओ क्लिपमुळे उडाली होती खळबळ.
वाचा: घोटाळ्याच्या आरोपानंतर पाटलांचा मुश्रीफांवर पलटवार; म्हणाले…
गेल्या महिन्यात पारनेर तालुक्यात हे प्रकरण गाजले होते. देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांच्याकडून त्रास दिला जात असल्याचा उल्लेख त्यामध्ये होता. यावरून राज्यभर चर्चा झाली. या प्रकाराला पुढे राजकीय स्वरूपही मिळाले. महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीची दखल घेऊन चौकशीचा आदेश देण्यात आला. त्यासाठी महिला अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करण्यात आली. तर दुसरीकडे देवरे यांच्याविरुद्ध काही ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींचीही चौकशी झाली. देवरे यांच्याविरुद्धच्या चौकशीचा अहवाल पूर्वीच आला आहे. त्यामध्ये देवरे यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा, पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर महिला आयोगाच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या चौकशीचा अहवालही आता प्राप्त झाला असून देवरे यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून येत नसल्याचे त्यात म्हटले आहे.
वाचा: साकीनाका घटनेची तुलना ‘हाथरस’शी; शिवसेनेनं भाजपला दिलं ‘हे’ प्रत्युत्तर
सरकारचे सहसचिव डॉ. माधव वीर यांनी सरकारच्या वतीने देवरे यांच्या बदलीचा आदेश काढला आहे. देवरे यांची पारनेरहून जळगाव जिल्ह्यात अकार्यकारी पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आलेले नाही. मात्र, त्यांच्याविरुद्धच्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने त्यांची बदली करण्यात येत आहे. हा आदेशच त्यांचा कार्यमुक्ती आदेश समजावा, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या जागी पारनेरला अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही.
देवरे प्रकरणावरून राज्यात राजकारणही पेटले होते. भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी देवरे यांची बाजू लावून धरली होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमदार लंके यांना अडचणीत पकडण्याचाही यावरून प्रयत्न झाला होता. मात्र, आता सरकारने देवरे यांची बदली केल्यामुळे विरोधकांची भूमिका काय असेल, हे लवकरच कळेल. तर दुसरीकडे देवरे यांनी स्थानिक चौकशी समितीला विरोध दर्शवत राज्यस्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करण्याची मागणी केली होती. त्यामुळे त्यांचीही पुढील भूमिका काय असेल याकडे लक्ष लागले आहे.
वाचा: साकीनाका बलात्कार प्रकरणी तपासाला मोठे यश; आयुक्तांनी दिली ‘ही’ माहिती