Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Airtel 49 Plan खरेदी केल्यास तुम्हाला १ दिवस अनिलिमिटेड डेटा मिळेल. म्हणजे हा खरेदी केल्यास तुम्हाला इंटरनेट डेटा संपण्याची भीती बाळगावी लागणार नाही आणि तुम्ही सहज घर बसल्या फास्ट इंटरनेटचा वापर करू शकाल. विशेष म्हणजे कंपनी 20GB Unlimited Data देत आहे. त्यानंतर देखील इंटरनेट वापरायचं असेल तर परंतु स्पीड खूप कमी मिळेल.
हा एक मोठा बदल आहे. म्हणजे आता तुम्ही या प्लॅनचा रिचार्ज करून सहज अनलिमिटेड इंटरनेट वापरू शकता. परंतु काही वेळाने इंटरनेट स्पीड कमी होऊन ६४Kbps होईल. आधी फक्त ६जीबी फास्ट इंटरनेट मिळत होतं. १ दिवसाच्या व्हॅलिडिटी व्यतिरिक्त सध्यातरी या प्लॅनमध्ये जास्त काही मिळत नाही. कंपनीनं आपल्या युजर बेस वाढवण्याच्या उद्देशाने हा बदल केल्याची चर्चा आहे.
९९ रुपयांच्या रिचार्जवर २ दिवसांची व्हॅलिडिटी
असे एअरटेलकडे दोन प्लॅन आहेत. जर तुम्हाला दोन दिवसांची व्हॅलिडिटी हवी असेल तर तुम्ही ९९ रुपयांच्या रिचार्जचा वापर करू शकता. म्हणजे तुम्हाला दोन दिवसाची व्हॅलिडिटी मिळेल. यात देखील २० जीबी हाय स्पीड डेटा मिळतो आणि त्यांनतर कमी स्पीडवर अमर्याद इंटरनेट वापरता येतं.
मुंबईत एअरटेल ब्रॉडबँड नंबर वन
मुंबईत एअरटेलनं ब्रॉडबँड स्पीडच्या बाबतीत जिओला मागे टाकलं आहे. ही माहिती ओपन सिग्नलच्या एका रिपोर्टमधून समोर आली आहे. ओपन सिग्नलनं जानेवारी २०२४ चा आपला अहवाल सादर केला आहे, त्यानुसार एअरटेल ब्रॉडबँडच्या अपलोड आणि डाऊनलोड स्पीडमध्ये जिओला मागे टाकलं आहे. जानेवारीमध्ये एअरटेलचा डाउनलोड स्पीड ५६.६एमबीपीएस इतका होता जो जिओ पेक्षा २४.६% जास्त आहे. एअरटेलचा अपलोड स्पीड ४४.६ एमबीपीसी होता, ज्यात जिओला १५.८ टक्के मागे राहिली.