Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Xiaomi 14 ची युरोपियन किंमत
Techmaniacs नुसार, ग्रीस मध्ये Xiaomi 14 च्या १२जीबी रॅम आणि ५१२जीबी स्टोरेज व्हर्जनची किंमत १,०९९ युरो (सुमारे ९८,२४० रुपये) पासून सुरु होऊ शकते. तर जुना Xiaomi 13 ची किंमत ८/२५६जीबी व्हेरिएंटची किंमत ९९९ युरो (सुमारे ८९,३११ रुपये) मध्ये लाँच केला गेला आहे. रिपोर्टनुसार, Xiaomi 14 ची विक्री २९ फेब्रुवारीपासून सुरु होईल. कंपनीच्या टीजरनुसार, Xiaomi 14 आणि Xiaomi 14 Ultra हे दोन फोन भारतात देखील लाँच होण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा:
चीनमध्ये आलेल्या Xiaomi 14 चे स्पेसिफिकेशन
Xiaomi 14 मध्ये ६.३६-इंचाचा १.५ के ओएलईडी एलटीपीओ डिस्प्ले, २०:९ अॅस्पेक्ट रेशियो, १-१२०हर्ट्झ व्हेरिएबल रिफ्रेश रेट, ३००० निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस, एचडीआर१०+, डॉल्बी व्हिजन, १९२० हर्ट्झ पीडब्लूएम डिमिंग आणि डीसी डिमिंगसह देण्यात आला आहे.
फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ चिपसेटसह एड्रेनो जीपीयू आहे. सोबत १६ जीबी पर्यंत एलपीडीडीआर५एक्स रॅम आणि १ टीबी पर्यंत यूएफएस ४.० स्टोरेज मिळते. हा डिव्हाइस अँड्रॉइड १४ आधारित हायपरओएसवर चालतो.
Xiaomi 14 मध्ये ५० मेगेपिक्सलचा मुख्य कॅमेरा Leica ब्रॅंडिंगसह मिळतो, तर ५० एमपी अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि ५० एमपी टेलीफोटो सेन्सर देखील आहे. सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी फ्रंटला ३२ एमपीचा कॅमेरा आहे. फोनमध्ये ९० वॉट फास्ट चार्जिंगसह ५० वॉट वायरलेस चार्जिंग देण्यात आली आहे, ज्याच्या माध्यमातून ४,६१०एमएएचची बॅटरी चार्ज केली जाईल.
Xiaomi 14 Ultra चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
Xiaomi 14 Ultra मध्ये ६.७-इंचाचा क्यूएचडी+ १२० हर्ट्झ एलटीपीओ अॅमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. फोन क्वॉलकॉमच्या सर्वात लेटेस्ट चिपसेट स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ वर आधारित असण्याची शक्यता आहे. स्मार्टफोनमध्ये १६जीबी पर्यंत रॅम सोबत १टीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळू शकते.
नवीन फोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप मिळू शकतो, ज्यात १ इंच सेन्सर आणि एलआयटी-९०० ५० मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, ५० मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलीफोटो, ५० मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड आणि ५० मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स मिळू शकते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.
हा फोन लेटेस्ट अँड्रॉइड १४ आधारित हायपरओएसवर चालू शकतो. फोनमध्ये ५,१८० एमएएचची बॅटरी ९०वॉट फास्ट चार्जिंग आणि ८०वॉट वायरलेस चार्जिंग सपोर्टसह दिली जाऊ शकते. Xiaomi 14 Ultra मध्ये आयपी६८ रेटिंग, सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीचा सपोर्ट, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल सिम ५जी, ब्लूटूथ, वायफाय सारखे अनेक फीचर्स दिले जाऊ शकतात.