Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
एटीएम मधील पैसै चोरणाऱ्या बंटी बबलीला अजनी पोलिसांनी केली अटक…
नागपूर (शहर प्रतिनिधी) – दोन चोरट्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये प्रवेश करून एटीएमला एक लोखंडी पट्टी लाऊन त्यास ट्रेस करून एटीएमचे नुकसान करून एटीएम मधील २०००/-रु. चोरी केले होते. या प्रकरणी फिर्यादी नामे स्वप्नील मारोतराव गभाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस ठाणे अजनी येथे अप.क. ८५/२४ कलम ३८०, ४२७, ३४ भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा पोलिसांनी कौशल्यपूर्ण जलदगतीने तपास करून
आदिल राजु खान, (वय २० वर्ष), रा.दानावली, पोस्ट. दत्तावली, जि. फत्तेपुर, राज्य उत्तरप्रदेश,
आणि प्रियंका सतवीर सिंग, (वय २१ वर्ष), रा. मुसदीपुर, जिल्हा कानपुर, राज्य उत्तरप्रदेश
या दोन बंटी बबलीला अटक करून नागपुर शहर येथील पोलिस ठाणे गणेशपेठ, पोलिस ठाणे तहसिल, पोलिस ठाणे लकडगंज येथील गुन्हे उघडकीस आणले आहेत.
या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.११फेब्रुवारी) रोजी ०६:३० वा.सू. फिर्यादी नामे स्वप्नील मारोतराव गभाने, (वय ३५ वर्ष), रा. प्लॉ.नं. ६३, पोलिस ठाणे सक्करदरा, नागपुर शहर, यांना त्यांच्या हेड.ऑफिस, मुंबई एटीएम कंट्रोलरूम येथुन फोनद्वारे माहिती मिळाली की, त्यांचे हनुमान नगर, किडा चौक ते मेडीकल चौक दरम्यान ठोंबरे भवन येथील महाराष्ट्र ग्रामिण बैंक एटीएम आयडी नंबर NA0137C2 वर कुणीतरी अज्ञात इसमाने ट्रेसपास केल्याची माहिती प्राप्त झाल्याने सदरची माहिती घेऊन फिर्यादी हे तात्काळ पोलीस ठाणे अजनी येथे मदत मागण्याकरिता आले असता पोलिसांनी लगेच सदर घटनास्थळी जावुन पंचासमक्ष घटनास्थळ पंचनामा कार्यवाही करून बारकाईने पाहणी केली असता असे निदर्शनास आले की, नमुद घटनास्थळावर कुणीतरी दोन अज्ञात इसमांनी महाराष्ट्र ग्रामिण बैंक एटीएम आयडी नंबर NA0137C2 असे असलेल्या एटीएम सेंटरमध्ये प्रवेश करून एटीएमला एक लोखंडी पट्टी लाऊन त्यास ट्रेस करून एटीएमचे नुकसान करून एटीएम मधील २०००/-रु. चोरी केल्याचे दिसुन आल्याने फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे अजनी येथे अप.क. ८५/२४ कलम ३८०, ४२७, ३४ भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
सदर गुन्हयाचे तपासामध्ये बिट मार्शल क्र.१ वरील नापोशि. सुर्यकांत तिवारी व पोशि. दिपक धांडे हे रात्रपाळी कर्तव्यावर हजर असतांना त्यांना अरोरा मोटर्स, बँक ऑफ महाराष्ट्र किडा चौक ते मेडिकल चौक दरम्यान बँक ऑफ महाराष्ट्र एटीएम मध्ये छेडछाड करत असल्याबाबत माहिती प्राप्त झाल्यावरून हे लगेच सदर घटनास्थळी गेले असता तेथे त्यांना कोणीहि दिसुन आले नाही. परंतु सदर घटनास्थळी लोखंडी पट्टी व चिमटा, एटिएम मशीन मधुन पैसे काढण्याकरीता लावले असल्याचे दिसुन आल्याने बिट मार्शल क्र.१ वरील कर्मचारी यांनी नमुद एटिएम च्या बाहेर येऊन एका घराच्या कंपाउंडच्या भिंतीजवळ लपुन एटीएम वर पाळत ठेवले असता तेथे काही वेळाने एक इसम व एक महिला पैसे काढण्याकरिता येतांना दिसुन आले. नमुद आरोपी इसम व महिला पैसे काढुन परत बाहेर जात असतांना त्यांच्या हातामध्ये गुन्हयात वापरलेला एक चिमटा दिसुन आला. ज्याचा वापर करून आरोपी हे एटिएम मध्ये पैसे काढण्याकरिता येणाऱ्या नागरिकांनी पैसे काढल्याचे नंतर आरोपी हे नमुद साहित्याचे साहाय्याने पैसे काढत असे. नमुद साहित्य दोन्ही आरोपींकडुन ताब्यात घेवुन दोन्ही आरोपींना पो. ठाणे येथे हजर केल्याने रात्रपाळी अधिकारी पोउपनि मारोती जंगीलवाड यांनी दोन्ही आरोपींकडे सखोल व बारकाईने विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे सांगितले. वरून सदरची माहिती वपोनि यांना देवुन त्यांच्या आदेशाने नमुद गुन्हयात अटक करण्यात आली. व आरोपींना न्यायालयात हजर करून आरोपीचा दि.१३ फेब्रुवारी पर्यंत ०३ दिवस पिसीआर प्राप्त करण्यात आला.
सदर गुन्हयात पिसीआर मधील आरोपी इसम व महिला यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता त्यांनी यापुर्वी नागपुर शहर येथील पोलीस ठाणे गणेशपेठ, पोलीस ठाणे तहसिल, पोलीस ठाणे लकडगंज येथे अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे कबुल केलेले आहे. तसेच पुणे येथे धिरेन्द्र परमेश्वर पटेल रा. महादापुर हा सदरची गँग चालवित असल्याचे सांगितले आहे.
सदरची कार्यवाही रविंद्र सिंघल,पोलिस आयुक्त, अश्वती दोरजे सह पोलिस आयुक्त, विजयकांत सागर पोलिस उप आयुक्त, , परि.क्र. ४, नागपुर शहर, बिराजदार सहा.पोलिस आयुक्त सक्करदरा विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भंडारे, सपोनि संदीप आगरकर, पोउपनि मारोती जंगिलवाड, पोउपनि पंकज बावणे, नापोशि. सुर्यकांत तिवारी व पोशि. दिपक धांडे यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.