Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भारतीय बाजारात आला Redmi चा सर्वात स्वस्त फोन; 6GB RAM सह Redmi A3 ची एंट्री

9

बजेट कॅटेगरीमध्ये नवीन नवीन डाव टाकत Xiaomi नं भारतात ‘A सीरीज’ चा लेटेस्ट स्मार्टफोन Redmi A3 लाँच केला आहे. ऑक्टा-कोर हेलियो जी३६ सह या फोनमध्ये ९०हर्ट्झ रिफ्रेश रेटसह मोठा ६.७१ इंचाचा एचडी+ एलसीडी स्क्रीन आहे. तसेच, यात ६जीबी पर्यंत रॅम आणि ६जीबी पर्यंत व्हर्च्युअल रॅम आहे. इतकंच नव्हे तर फोनमध्ये एक साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे आणि यूएसबी टाइप-सीवर १० वॉट चार्जिंगसाठी ५०००एमएएचची बॅटरी आहे. चला जाणून घेऊया या फोनची किंमत, सेल आणि फुल स्पेसिफिकेशन्सची माहिती पाहूया.

Redmi A3 चे स्पेसिफिकेशन्स

फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले आणि स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत. तसेच खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये वॉल्यूम रॉकर तसेच पावर बटन फोनच्या उजवीकडे आहे. Redmi A3 चा बॅक पॅनल खूप हटके आहे. यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो पॅनलच्या वरच्या बाजूला एका सर्कुलर रिंगमध्ये आहे. रियर कॅमेरा सेटअपमध्ये दोन कॅमेरा लेन्स तसेच एक फ्लॅश लाइट हॉरिजॉन्टल शेपमध्ये देण्यात आले आहेत. खालच्या बाजूला Redmi ची ब्रँडिंग आहे.

यात ६.७१-इंचाचा (१६५० x ७२० पिक्सल) एचडी+ आयपीएस एलसीडी स्क्रीन आहे जी ९०हर्ट्झ रिफ्रेश रेट, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ प्रोटेक्शनसह आली आहे. फोनमध्ये २.२ GHz ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलियो जी३६ १२नॅनोमीटर प्रोसेसर आहे, जो आयएमजी पावरव्हीआर जीई८३२० जीपीयूसह येतो. डिव्हाइसमध्ये ६जीबी पर्यंत एलपीडीडीआर४एक्स रॅम आणि १२८जीबी पर्यंत ईएमएमसी ५.१ इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच मायक्रोएसडीसह १टीबी पर्यंत एक्सपांडेबल मेमरी ऑप्शन आहे. फोन कंपनीनं अँड्रॉइड १३ (गो व्हर्जन) सह सादर केला आहे जो ड्युअल सिम (नॅनो + नॅनो + मायक्रोएसडी) सह आला आहे.

डिव्हाइसमध्ये एफ/२.० अपर्चर एलईडी फ्लॅशसह ८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि एक सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, व्हिडीओ कॉलिंग व सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे. ड्युअल ४जी वीओएलटीई, वाय-फाय ८०२.११ बी/जी/एन, ब्लूटूथ ५.०, जीपीएस + ग्लोनास, यूएसबी टाइप-सी पोर्ट देखील मिळतो. फोनमध्ये १० वॉट चार्जिंगसह ५०००एमएएचची बॅटरी आहे. हँडसेटमध्ये ३.५ मिमी ऑडियो जॅक, एफएम रेडियो आणि साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.

Redmi A3 ची किंमत आणि सेल

Redmi A3 चे तीन मॉडेल भारतात लाँच करण्यात आले आहेत. यातील ३जीबी रॅम व ६४जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत ७,२९९ रुपये आहे. तर ४जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत ८,२९९ रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच रेडमी ए३चा ६जीबी रॅम व १२८ जीबी मॉडेल खरेदी करण्यासाठी ९,२९९ रुपये मोजावे लागतील. हा फोन २३ फेब्रुवारीपासून फ्लिपकार्ट, Mi.com, Mi होम स्टोर्स आणि रिटेल स्टोर्सवर उपलब्ध होईल.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.