Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
bjp to complaint against cm: परप्रांतीयांची नोंद; भाजप आक्रमक, मुख्यमंत्र्यांविरोधात करणार पोलिसात तक्रार
हायलाइट्स:
- परराज्यातून येणाऱ्यांच्या नोंदी ठेवण्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांचे आदेश.
- भाजपने मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेवर नोंदवला आक्षेप.
- भाजप मुख्यमंत्र्यांविरोधात करणार पोलिसात तक्रार.
मुख्यमंत्री ठाकरे यांचा निषेध करताना भाजप आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता परप्रांतीयांचा हिशोब ठेवणार आहेत. परप्रांतीय कुठून येतात, कुठे जातात याबाबत पोलिस परप्रांतीयांच्या नोदीं ठेवतील असे मुख्यमंत्री म्हणतात. मुख्यमंत्र्यांना असे सांगताना लज्जा वाटायला हवी होती. कारण याच परप्रांतीयांना आकर्षित करण्यासाठी तुम्ही ‘लाही-चणा’ हा कार्यक्रम ठेवता. ‘केम छो वरली’ म्हणता. काँग्रेसच्या सोबत जाण्यामुळे काय तुम्ही रोहिंग्यो मुसलमानांना विसरून गेलात का? बांगलादेशी मुसलमानांच्या कारनाम्यांना विसरलात का?, असे सवाल भातखळकर यांनी उपस्थित केले आहेत.
क्लिक करा आणि वाचा- परप्रांतीयांची नोंद ठेवा; ते येतात कुठून, जातात कुठे याची माहिती ठेवा: मुख्यमंत्री
परप्रांतीयांच्या नोंदी ठेवणे हे पूर्णपणे चुकीचे असून याबाबत मी मुख्यमंत्र्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो, असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांच्या दोन समाजगटांमध्ये तेढ आणि विद्वेष निर्माण करण्यावरून मी कलम १५३ अ अंतर्गत तक्रार करण्याची आवश्यकता असून येत्या काही दिवसांत आपण अशी तक्रार करणार असल्याचे भातखळकर यांनी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा- गुजरात मॉडेल म्हणायचे ते हेच का? शिवसेनेचे पंतप्रधानांवर शरसंधान
मुख्यमंत्र्यांनी नेमके काय आदेश दिले?
साकीनाका निर्भया प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस महासंचालक कार्यालयात एक बैठक गेतली. या बैठकीत महिलांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी परप्रांतातून येणाऱ्या लोकांच्या नोेदी ठेवण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. राज्यात बाहेरून कोण येतो, कोठून येतो, कोठे जातो याची नोंद ठेवा, असे आदेशच मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले.
क्लिक करा आणि वाचा- कोकणात राजकीय घडामोडींना वेग; नीलेश राणे कुडाळमधून विधानसभा निवडणूक लढवणार?