Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

samarjeet ghatge vs hasan mushrif: ‘मुश्रीफ यांच्या धमक्यांना मी घाबरत नाही, अशा धमक्या गल्लीतल्या कार्यकर्त्यांना द्या’

18

हायलाइट्स:

  • सोमय्यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी हसन मुश्रीफ यांनी घेतले भाजप जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांचे नाव.
  • याबाबत समरजीत घाटगे यांनी दिला हसन मुश्रीफ यांना इशारा.
  • मुश्रीफ यांच्या धमक्यांना मी घाबरत नाही, त्यांनी अशा धमक्या गल्लीतल्या कार्यकर्त्यांना द्याव्यात- घाटगे.

कोल्हापूर: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या धमक्यांना मी घाबरत नाही, त्यांनी अशा धमक्या गल्लीतल्या कार्यकर्त्यांना द्याव्यात असा जोरदार निशाणा भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी मंत्री मुश्रीफ यांच्यावर साधला. किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपाबाबत आपल्याला काहीही माहित नाही, तरीही केवळ विषयाला वेगळे वळण देण्यासाठी मुश्रीफ यांनी त्या प्रकरणात आपले नाव घेतल्याचा दावाही त्यांनी केला. (kolhapur bjp chief samarjeet ghatge criticizes minister hasan mushrif)

दुपारी मंत्री मुश्रीफ यांनी सोमय्या यांचे आरोप फेटाळून लावताना या कटकारस्थानात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व घाटगे हे दोघे असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर सायंकाळी घाटगे यांनी पत्रकार बैठक घेऊन मुश्रीफ यांच्यावर पलटवार केला.

क्लिक करा आणि वाचा- परप्रांतीयांची नोंद; भाजप आक्रमक, मुख्यमंत्र्यांविरोधात करणार पोलिसात तक्रार

घाटगे म्हणाले, भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केलेल्या त्या आरोपांच्या बाबतीत मी अनभिज्ञ आहे.
सर्व सामान्य जनतेप्रमाणेच मलाही ते प्रसारमाध्यमांमधूनच समजले. त्यामुळे मुश्रीफ यांच्या बाबतीत सोमय्या यांना माहिती पुरवण्याच्या संदर्भात त्यांनी घेतलेले माझे नाव म्हणजे मुश्रीफांच्या राजकारणाचा तो एक भाग आहे. असे राजकारण करण्याचे संस्कार आमचे नाहीत आणि ते यापुढे ही असणार नाहीत. आमचे नाव घेऊन या विषयाला त्यांनी राजकीय वळण देऊ नये. खासदार सोमय्या यांच्यासह संबंधित तपास यंत्रणेला थेट उत्तर द्यावे. या प्रकरणांमध्ये माझा काडीचाही संबंध नसताना त्यांनी माझे नाव घेतले आहे. याचा अर्थ माझे नाव घेतल्याशिवाय त्यांचे राजकारण होत नाही.

क्लिक करा आणि वाचा- परप्रांतीयांची नोंद ठेवा; ते येतात कुठून, जातात कुठे याची माहिती ठेवा: मुख्यमंत्री

मंत्री मुश्रीफ यांनी पैरा फेडण्याच्या केलेल्या वक्तव्याबाबत पत्रकारांनी विचारले असता श्री. घाटगे म्हणाले, अश्या गल्लीतल्या धमक्यांना मी घाबरत नाही. राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या रक्ताचा वारस व स्व विक्रमसिंह राजे घाटगे यांचा मी चिरंजीव आहे. आणि जर घाबरत असतो तर अपक्ष म्हणून निवडणूक तुमच्या विरोधात लढलो नसतो. जनता माझ्यासोबत असल्यामुळे मला ९० हजार मते मिळाली. या बाबत सुद्धा जनताच त्यांना उत्तर देईल. सोमय्या यांनी केलेल्या आरोपांना थेट उत्तर न देता त्यांनी माझे व चंद्रकांत दादा यांचे नाव घेऊन राजकारण केले आहे .मी मात्र त्यांच्यावर कधीही टीका केलेली नाही. ते मात्र सतत माझ्यावर टीका करत असतात.

क्लिक करा आणि वाचा- गुजरात मॉडेल म्हणायचे ते हेच का? शिवसेनेचे पंतप्रधानांवर शरसंधान

सोमय्या यांच्यावर शंभर कोटींची अब्रुनुकसानीचा दावा दाखल केल्यावर बद्दल विचारले असता घाटगे म्हणाले, मुश्रीफ यांना असा इशारा देण्याची सवय आहे. मानहानीचा दावा आणि हत्तीवरून मिरवणूक ही त्यांची कायमची वक्तव्ये आहेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र खंडपीठ काढावे लागेल.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.