Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मालेगाव शहरातील युवकाचा गोळ्या घालून खुन करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड…
मालेगाव(नाशिक ग्रामीण) प्रतिनिधी – याबाबत व्रुत्त असे की,
दि. ०५/०२/२०२४ रोजी रात्रीचे सुमारास मालेगाव शहरातील ओवाडी नाला, रमजानपुरा परिसरात रोडवर मयत इब्राहिम खान इस्माईल खान, वय २९, रा. नागछाप झोपडपट्टी, मालेगाव याने मसूद गांजावाला याचा गांजा पकडून दिला व आरोपी युसूफ छिचडा याचे मुलीस पळवून नेऊन लग्न केले या कारणावरून, यातील
आरोपीतांनी संगनमत करून कट रचून मयत हा मोटरसायकलने जात असतांना त्याचेवर हल्ला करून त्याचे डोक्यात पिस्तुलमधून गोळी मारून त्यास जिवे ठार मारले म्हणून फिर्यादी इस्माईल खान इसा खान, रा. नागछाप झोपडपट्टी, मालेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मालेगाव शहरातील रमजानपुरा पोलिस ठाणे येथे गुरनं २२/२०२४ भादवि कलम ३०२, ५०६, १२० (ब) सह भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे दिनांक ०६/०२/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांचे मार्गदर्शनानूसार अपर पोलिस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती, उपविभागीय पोलिस अधिकारी मालेगाव शहर तेगबीरसिंग संधु, रमजानपूरा पोलिस ठाण्याचे सपोनि ज्ञानेश्वर बडगुजर, स्थानिक गुन्हे शाखा मालेगाव युनिटचे सपोनि हेमंत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून घडले परिस्थीतीची पाहणी केली. सदर गुन्हयात आरोपी नामे १) शेख युसूफ शेख बुडन कुरेशी उर्फ युसूफ छिचडा, वय ५३ वर्षे, २) रियान शेख युसूफ शेख, वय २० वर्षे, दोन्ही रा. देवीचा मळा, दानिश पार्क, मालेगाव यांना अटक करण्यात आली होती. पोलीस कोठडी दरम्यान केलेल्या चौकशीत सदर गुन्हयात घटनास्थळावर मिळालेले भौतिक पुरावे, सी.सी.टी.व्ही. फुटेज तसेच उपलब्ध तांत्रिक माहितीचे विश्लेषण केले असता, यातील आरोपी रियान शेख याने मयत इब्राहिम यास पिस्तूलमधून गोळी मारून जिवे ठार मारले असल्याचे निष्पन्न झाले असून तशी कबुली दिली होती. पुढील तपासात यातील मुख्य आरोपी रियान शेख युसूफ शेख यास गुन्हा करण्यासाठी पिस्तुल पुरविणारा आरोपी नामे ३) शेख शहजाद शेख रफिक, वय २३, रा. जाफरनगर, मालेगाव, हल्ली मिर्झा कॉलनी, सिल्लोड, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद यास औरंगाबाद जिल्हयातून ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी रियान शेख याने गुन्हयात वापरलेले देशी बनावटीचे पिस्तुल जप्त करण्यात आली आहे. तसेच मुख्य आरोपी रियान शेख याने
गुन्हा केल्यानंतर त्यास घटनास्थळावरून आरोपी नामे ४) समीर शेख शब्बीर, वय – १९ वर्ष, रा निहालनगर, गल्ली नंबर ०५, अवलिया मस्जिद जवळ, मालेगांव, ता. मालेगांव जि. नाशिक याने त्याचे ताब्यातील मोटार सायकलवर आरोपी क्रमांक ०२ यास बसवुन तेथुन पळुन जाण्यासाठी मदत केली आहे. आरोपी समीर शेख शब्बीर यास ताब्यात घेण्यात आले असून त्यांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटर सायकल जप्त करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास रमजानपुरा पोलिस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार करीत आहे. वरील खुनाचे गुन्हयात नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस
अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती, उपविभागीय पोलिस अधिकारी मालेगाव शहर विभाग तेघबीर संधु यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे, रमजानपुरा पो.स्टे. चे सपोनि ज्ञानेश्वर बडगुजर, स्थागुशाचे सपोनि हेमंत पाटील, पोउनि संदिप पाटील, पोहवा चेतन संवस्तरकर, पोना देविदास गोविंद, नरेंद्र कोळी, सुभाष चोपडा, शरद मोगल, योगेश कोळी, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, विनोद टिळे, गिरीष बागुल, तसेच रमजानपुरा पो.स्टे. चे पोहवा दिपक खैरणार, पोना राजु चौधरी, सचिन वराडे यांचे पथकाने वरील आरोपींना ताब्यात घेवून गुन्हा उघडकीस आणलेला आहे.