Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पडल्यावर देखील न फुटणारा डिस्प्ले, 5800mAh ची बॅटरी आणि 108MP कॅमेरा; इतकी आहे Honor X9b ची किंमत

9

Honor X9b भारतीय स्मार्टफोन बाजारात सादर करण्यात आला आहे. हँडसेट या सेगमेंटमधील टिकाऊ हँडसेट असल्याचा दावा कंपनी करत आहे. या डिवाइसला फाइव-स्टार ओव्हरऑल ड्रॉप रेजिस्टंट सर्टिफिकेट मिळालं आहे. ऑनर एक्स९बी मध्ये १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट १.५के अ‍ॅमोलेड डिस्प्ले, १०८एमपी प्रायमरी कॅमेरा आणि ५,८००एमएएचची बॅटरी देखील आहे. चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती.

Honor X9b 5G Price In India

Honor X9b 5G सिंगल स्टोरेज ऑप्शनमध्ये भारतीय बाजारात आला आहे. फोनमध्ये ८जीबी रॅम व २५६जीबी स्टोरेज आहे, याची किंमत २५,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा डिवाइस मिडनाईट ब्लॅक आणि सनराइज ऑरेंज अश्या दोन कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे.

लाँच ऑफर अंतगर्त आयसीआयसीआय बँक कार्डवर ३,००० रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. तसेच डिव्हाइसवर कंपनी ५,००० रुपयांचा एक्स्ट्रा एक्सचेंज बोनस देखील देत आहे. हा ऑनर फोन १६ फेब्रुवारी म्हणजे उद्यापासून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन, कंपनी वेबसाइट आणि अन्य रिटेल आउटलेट्स वर सेलसाठी उपलब्ध होईल.
हे देखील वाचा:
‘या’ फोनला टेम्पर्ड ग्लासची गरज नाही; जाणून घ्या ‘एअरबॅग’ टेक्नॉलॉजी म्हणजे काय? भारतात येतोय पहिला स्मार्टफोन

Honor X9b 5G चे स्पेसिफिकेशन्स

Honor X9b च्या मागे दोन सोनेरी रिंग आहेत, ज्यात कॅमेरा मॉड्युल देण्यात आला आहे. यात प्लास्टिक फ्रेमचा वापर करण्यात आला आहे. स्मार्टफोनचे वजन फक्त १८५ ग्राम आहे आणि जाडी ७.९८ मिमी आहे. तसेच फोनच्या फ्रंटला पंच-होल कटआउट मिळते, ज्यात फ्रंट कॅमेरा आहे.हँडसेट मध्ये खूप पातळ बेजल्स मिळतात.

फोनमध्ये १.५k रिजोल्यूशन असलेला ६.७८-इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि १९२०हर्ट्झ पीडब्ल्यूएम डिमिंग व १२०० निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड १३-आधारित मॅजिकओएस ७.२ वर चालतो.

ऑनर एक्स९बी मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६ जेन १ चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. सोबत एड्रेनो ए७१० जीपीयू आणि एक बिल्ट-इन ५जी मॉडेम आहे. जोडीला ८जीबी रॅम आणि २५६जीबी नॉन-एक्सपांडेबल स्टोरेज मिळते. फोनची स्टोरेज वापरून ८जीबी पर्यंत रॅम देखील वाढवता येतो.

ऑनर एक्स९बी मध्ये १०८ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळतो. सोबत ५ एमपीची अल्ट्रा-वाइड लेन्स आणि २एमपीचा मॅक्रो यूनिट देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हँडसेटमध्ये १६ एमपीचा स्नॅपर आहे. HONOR X9b मध्ये ५,८००एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी ३५वॉट फास्ट चार्जिंगच्या मदतीनं चार्ज केली जाते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.