Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सावधान! हे १२ मोबाइल अ‍ॅप्स ठेवत आहेत तुमच्यावर पाळत; जाणून घ्या पाकिस्तान कनेक्शन

8

मोबाइलवर हनी ट्रॅपचा मोठा स्कॅम सुरु आहे, जो मोबाइल फोनच्या माध्यमातून साध्य केला जातो. यासाठी मोबाइलवर रोमांटिक आणि सेक्सुअल कंटेंटच्या माध्यमातून युजर्सना जाळ्यात ओढलं जातं. त्यानंतर त्या युजर्सना एक ट्रोजन अ‍ॅप डाउनलोड करायला सांगितलं जातं. या अ‍ॅप्स मध्ये घातक कोड इंस्टॉल केलेला असतो, ज्याच्या माध्यमातून मोबाइल फोन युजर्सवर पाळत ठेवली जाते.

भारत पाकिस्तान कनेक्शन

या १२ अँड्रॉइड अ‍ॅप्सचं केंद्र भारत आणि पाकिस्तान आहे. म्हणजे या दोन्ही देशाच्या मोबाइल युजर्सना १२ अ‍ॅप्स टारगेट करत आहेत. विशेष म्हणजे गुगल प्ले स्टोर आणि थर्ड पार्टी प्ले स्टोरवर १२ अ‍ॅप्स उपलब्ध होते. जे आता गुगल प्ले स्टोरवरून काढून टाकण्यात आले आहेत. परंतु जर तुमच्या फोनमध्ये हे अ‍ॅप्स असतील तर त्वरित डिलीट करून टाका.

चोरी करतात फाईल्स आणि फोटो

सिक्योरिटी रिसर्चर ESET नं या महिन्याच्या सुरुवातीला असे १२ हेरगिरी करणारे अँड्रॉइड अ‍ॅप्स शोधून काढले होते. की सर्व अ‍ॅप्स न्यूज आणि मेसेजिंग टूल असल्याचा दावा करतात. या अ‍ॅप्स मध्ये हेरगिरी करण्याचे फंक्सन असतात, जे मोबाइल युजरचे कॉन्टॅक्ट, फाईल्स, कॉल लॉग आणि मेसेज अ‍ॅक्सेस करतात. असा दावा केला जात आहे की यातील काही अ‍ॅप WhatsApp आणि Signal चे मेसेज देखील ट्रॅक करू शकतात. तसेच फोन कॉल रेकॉर्ड देखील करू शकतात आणि कॅमेरा अ‍ॅप मधून फोटो आणि व्हिडीओ घेऊ शकतात.

गुगल प्ले स्टोरवरील अ‍ॅप्स

  • Hello Chat
  • Chit Chat
  • Meet Me
  • Nidus
  • Rafaqat News
  • Tik Talk
  • Wave Chat
  • Prive Talk
  • Glow Glow
  • Lets Chat
  • NioNio
  • Quick Chat
  • Yoho Talk

Xamalicious असलेले अ‍ॅप्स

  • Essential Horoscope for Android
  • 3D Skin Editor for PE MinecraftLogo Maker Pro
  • Auto Click Repeater
  • Count Easy Calorie Calculator
  • Sound Volume Extender
  • LetterLink
  • Numerology: Personal Horoscope & Number Predictions
  • Step Keeper: Easy Pedometer
  • Track Your Sleep
  • Sound Volume Booster
  • Astrological Navigator: Daily Horoscope & Tarot
  • Universal Calculator

सिद्धेश जाधव यांच्याविषयी

सिद्धेश जाधव

सिद्धेश जाधव जवळपास 6 वर्ष डिजिटल मीडियामध्ये टेक्नोलॉजी विषयी लिहीत आहे. सुरुवातीपासूनच टेक विषयी माहिती वाचकांना समजेल अशा सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. कामाव्यतिरिक्त सिद्धेशला प्रवास करायाला आवडतं. नेहमीच तो वेगवेगळ्या गड किल्ल्यांवर आणि ऐतिहासिक ठिकाणी फिरत असतो. फावल्या वेळात त्याला चित्रपट बघायला आवडतात. कधीकधी तो आपल्या भावना आणि विचार चारोळ्यांच्या माध्यमातून व्यक्त करतो.… Read More

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.