Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

चिनी कंपन्यांना कंटाळलात? बाजारात आला भारतीय बनावटीचा स्वस्त टॅबलेट; BharatGPT AI सह Milkyway लाँच

10

एपिक फाउंडेशननं अँड्रॉइड टॅबलेट Milkyway लाँच केला आहे जो भारतात डिजाइन करण्यात आलेला पहिला टॅबलेट आहे. याची खासियत म्हणजे यात BharatGPT AI चा सपोर्ट देण्यात आला आहे. हा टॅबलेट एज्युकेशन सेक्टरचा विचार करून बनवण्यात आला आहे. टॅबलेटमध्ये ८ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा MediaTek चिपसेटसह येतो. डिव्हाइसमध्ये ४ जीबी रॅम, आणि ६४ जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. चला जाणून घेऊया याबाबत.

HCL -फाउंडर डॉक्टर अजय चौधरी आणि अर्जुन मल्होत्रा यांच्या नेतृत्वातील EPIC Foundation एक नॉट-फॉर-प्रोफिट संस्था आहे जिने भारतात आपला पहिला टॅबलेट Milkyway सादर केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, टॅबलेट VVDN Technologies, MediaTek India, आणि CoRover.ai. यांच्या भागेदारीतुन सादर करण्यात आला आहे. कंपनीचे ध्येय एक असा टॅबलेट लाँच करण्याचं होतं जो रिपेयर देखील करता येईल आणि अपग्रेड देखील करता येईल.

टॅबलेट आत्मनिर्भर भारत अभियानाच्या दृष्टीने खास डिजाइन करण्यात आला आहे. ज्यात असे कॉम्पोनेंट्स वापरण्यात आले आहेत जे सहज बदलता येतील आणि अपग्रेड देखील करता येतील. BharatGPT व्हर्च्युअल असिस्टंटचा सपोर्ट देखील यात देण्यात आला आहे. ज्यामुळे अभ्यासात मदत होईल आणि यात वेगवेगळ्या भाषांचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

Milkyway Tablet specifications

Milkyway मध्ये ८ इंचाचा IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. जो सहज बदलता येतो. याचे रिजॉल्यूशन ८००x१२८० पिक्सल आहे. फ्रंटला ३ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तर मागे ८ मेगापिक्सलचा सेन्सर मिळतो. टॅबलेटचे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता यात MediaTek 8766A प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर यात ४जीबी रॅम आणि ६४GB स्टोरेज देण्यात आली आहे. स्टोरेज एक्सपांड देखील करता येईल. हा टॅबलेट अँड्रॉइड १३ ओएसवर चालतो. Milkyway टॅबलेटमध्ये ५१०० एमएएचची बॅटरी आहे. ही देखील रिप्लेस करता येते. कनेक्टिव्हिटीसाठी यात ४जी एलटीई सोबतच ब्लूटूथ ५.० चा सपोर्ट मिळतो.

Milkyway Tablet Price

शैक्षणिक संस्थांमध्ये टॅबलेटचे वितरण IRIS करेल. हा टॅबलेट पुढील दोन महिन्यांच्या कालावधीत बाजारात उपलब्ध होईल. याची किंमत अदयाप अधिकृतपणे घोषित करण्यात आलेली नाही. परंतु सांगण्यात आलं आहे की टॅबलेटची किंमत ८,४०० रुपयांच्या आसपास असेल.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.