Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अमरावती शहर पोलिसांची कुख्यात टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई….
अमरावती (शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्तालय अमरावती शहर हद्दीतील पोलिस स्टेशन नागपुरी गेट अंतर्गत झेंडा चौक पठाणपुरा येथे फिर्यादी नामे शोएब परवेझ अब्दुल रशीद (वय ३५ वर्षे) व्यवसाय प्रॉपटॉ ब्रोकर हा (दि.२० डिसेंबर२०२३) रोजी रात्री ०२.३० ते ३.०० वा.चे सुमारास त्यांचे सासरे (चाचा) हयांच्या घरी त्यांचे क्रेटा गाडीने पठाण पुरा झेंडा चौक येथुन जात असताना शोएब परवेज यांचा एक ते दिड वर्षापुर्वी नमुद आरोपी १) मोहम्मद खालीद पहेलवान २) इमरान जवाई ३) रफीक सोबत भांडण झाले होते त्यावरुन पो.स्टे गाडगेनगर येथे कलम ३०७, ३४ भादंवी अन्वये गुन्हा दाखल झालेला होता त्यावरुन आरोपी हे फिर्यादीचा राग करीत होते व नमुद घटना तारीख वेळी व टोकाणी यातील आरोपींनी झेंडा चौक पठाणपुरा येथे फिर्यादीची गाडी समोर येऊन गाडीचे खाली उतरुन आरोपींनी चाकुने शोएब यास गंभीर जखमी करुन जिवानीशी ठार मारण्याच्या उद्देशाने जखमी केले व पळुन गेले त्यानंतर शोएब हा पुढील उपचारा कामी सुयश हॉस्पिटल व नंतर एक्झान हॉस्पिटल येथे ॲडमीट होता. अशा शोएब च्या बयानावरुन पोस्टे नागपुरी गेट येथे वरील नमुद गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सदर गुन्हयातील शोएब हा उपचारा दरम्यान दि.५जानेवारी २०२४ रोजी मरण पावल्याने सदर गुन्हयामध्ये कलम ३०२ भादवि वाढविण्यात आले होते.
सदर गुन्हयाचे तपासात
(१) मोहम्मद इमरान ऊर्फ जवाई मोहम्मद जमील (वय ३६ वर्षे), रा.नुरनगर, अमरावती
२) मोहम्मद खलीफ ऊर्फ पहेलवान मोहम्मद मुस्ताक (वय ४३ वर्षे), रा.पठाणपुरा
३) अब्दुल रुफीक अब्दुल रहीम (वय ३८वर्षे), रा.कमेला ग्राऊंड, नुरानी मस्जीद मागे अमरावती
४) अब्दुल मोहसीन अब्दुल बशीर (वय २८ वर्षे), पठाणपुरा अमरावती
५) अब्दुल फहीम अब्दुल सलीम (वय ३० वर्षे), रा.सिद्यीक मस्जीदजवळ, पठाणपुरा अमरावती
६) अब्दुल आवेद ऊर्फ गुडडु अब्दुल हबीब (वय २४ वर्षे),रा.सिद्दीक मस्जीद जवळ, अमरावती
हे आरोपी निष्पन्न झालेले असुन आरोपी क्रमांक १,२ व ३ हे अमरावती जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. परंतु नमुद तडीपार आरोपींनी कोणतीही पूर्व परवानगी न घेता अमरावती शहरात पो.स्टे. नागपुरी गेट हद्दीत प्रवेश केल्याने त्यांचे विरुध्द कलम १४२ मपोका, प्रमाणे कारवाई करुन नमुद गुन्हयामध्ये समाविष्ट केला आहे.
सदर गुन्हयातील सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली असुन आज पर्यंत ते अमरावती कारागृह येथे बंदीस्त आहेत. सदर गुन्हयाच्या तपासा दरम्यान यातील टोळी प्रमुख मोहम्मद इमरान ऊर्फ जवाई मोहम्मद जमील (वय ३६ वर्षे), रा.नुरनगर, अमरावती हा आपल्या व टोळीतील सदस्याचे आर्थीक लाभाकरीता व गुन्हेगारी वर्चस्वाकरीता पोलिस आयुक्तालय अमरावती हद्दीत वैयक्तीकपणे व संघटीतपणे स्वतः व टोळीतील सदस्या मार्फत गुन्हे करीत असुन सध्या ही टोळी सक्रीय आहे. या टोळीतील सदस्याविरुध्द पोलिस आयुक्तालय अमरावती शहर हद्दीत वेगवेगळया पोलिस स्टेशनला बरेच गुन्हे नोंद असल्याने पोलिस आयुक्त, अमरावती शहर यांच्या परवानगीने सदर गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३ (२), ३ (४) प्रमाणे कलम वाढ करण्यात आली आहे.
सदर गुन्हयाच्या तपासात गुन्हेगारी टोळी आपल्या आर्थीक लाभाकरीता संघटीतपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलिस उपायुक्त परिमंडळ १ सागर पाटील, तत्कालीन सहा. पोलिस आयुक्त गाडगेनगर विभाग, श्रीमती पुनम पाटील व वरिष्ठ पोलिस निरीक्षक हनुमंत उरलागोंडावार, पोलिस अंमलदार संदीप देशमुख यांनी सदर कामगीरी केलेली आहे. सदर गुन्हयाचा तपास सहायक पोलिस आयुक्त, गाडगेनगर विभाग अरुण पाटील हे करीत आहेत.