Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नव्या व्हायरसचा सर्वांना धोका
Golddigger या अँड्रॉइड ट्रोजन व्हायरसवर आधारित GoldPickaxe व्हायरस आता आयओएस आणि इतर सर्व ऑपरेटिंग सिस्टमसाठी धोकादायक ठरत आहे. या व्हायरसच्या विरोधात युजर्सना खबरदारीचे उपाय करावे लागतील. Group-IB या रिसर्च ग्रुपने कंफर्म केलं आहे की हा नवीन व्हायरस तुमचा फेशियल रेकग्निशन डेटा गोळा करतो आणि तुमचे बँक अकाऊंट्स देखील चोरतो.
GoldPickaxe.iOS व्हायरस सोशल इंजिनियरिंगचा वापर करून तुमच्या बँक अकॉऊंट्सचा अॅक्सेस मिळवू शकतो. हा नवीन व्हायरस सध्या व्हिएतनाम आणि थायलंड परिसरात जास्त दिसत आहे. भविष्यात याचा प्रसार यूएससह इतर भागांमध्ये देखील होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. Group-IB रिसर्चर्सनी GoldPickaxe वर आपले संशोधन सुरु ठेवलं आहे आणि ते संबंधित ब्रँड्सना रिपोर्ट्स पाठवले आहेत.
जर तुमच्याकडे अँड्रॉइड किंवा आयओएस ऑपरेटिंग सिस्टम असेल, तर अनोळखी सोर्समधून कोणतेही अॅप्लिकेशन किंवा फाइल इत्यादी इंस्टाल न करण्याचा सल्ला दिला जात आहे. अलीकडेच आलेला नवीन व्हायरस तुमची माहिती चोरू शकतो. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनची काळजी घेतली पाहिजे.
काय काळजी घ्याल?
- तुम्हाला अँड्रॉइड अॅप्स डाउनलोड करायचे असतील तर कोणत्याही थर्ड पार्टी अॅपच्या साईटवरून कोणतेही अॅप डाउनलोड करू नका. प्लेस्टोअर, अॅप स्टोअरवरुनच डाऊनलोड करा.
- कोणतेही अॅप डाउनलोड करण्यापूर्वी, त्याचे रिव्ह्यूव वाचा. तुम्हाला काही चुकीचे आढळल्यास ते अॅप डाउनलोड करू नका.
- जर एखाद्या अॅपने तुम्हाला कोणतीही परवानगी मागितली तर तुम्ही फक्त त्या परवानग्या द्याव्या ज्या आवश्यक आहेत.
- तुमच्या डिव्हाइसवर नेहमी अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर ठेवा.
- फोनमध्ये येणाऱ्या सर्व सॉफ्टवेअर अपडेट्ससह फोन अपडेट ठेवा.