Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

7000mAh बॅटरी असलेला फोन फक्त ७२९९ मध्ये; पाहा कुठे मिळत आहेत धमाकेदार डील

7

पावरफुल बॅटरी असलेला फोन सोबत बाळगण्याचा फायदा असा आहे की तुम्हाला वारंवार चार्जर शोधावा लागत नाही आणि तुम्ही बेफिकीरपणा घरातून बाहेर पडू शकता. Amazon वर ७००० रुपयांच्या आसपास 7000mAh ची बॅटरी असलेला स्मार्टफोन मिळत आहे. खास डीलचा फायदा itel P40+ वर दिला जात आहे. डिस्काउंटसह विकल्या जाणाऱ्या itel P40+ मध्ये Memory Fusion टेक्नॉलॉजीसह 8GB RAM ची ताकद मिळत आहे. त्याचबरोबर हा फोन १८ वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. चांगल्या लूकसाठी कंपनीनं यात प्रीमियम डिजाइनचा वापर केलं आहे तसेच एक पावरफुल कॅमेरा सेटअप बॅक पॅनलवर दिला आहे.

जबरदस्त डिस्काउंटसह खरेदी करा itel P40+

लाँचच्या वेळी itel P40+ ची किंमत ८०९९ रुपये ठेवण्यात आली होती, ही फोनच्या ४जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत आहे. परंतु अ‍ॅमेझॉनवर हा डिव्हाइस आता ७,२९९ रुपयांमध्ये विकला जात आहे. जुना फोन एक्सचेंज करून तुम्ही यावर ६,९०० रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट देखील मिळवू शकता. हा डिस्काउंट तुमच्या फोन मॉडेल त्याची सध्य परिस्थिती यावर अवलंबून असेल. हा डिवाइस आइस स्यान आणि फोर्स ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

itel P40+ चे स्पेसिफिकेशन्स

कंपनीनं बजेट डिव्हाइसमध्ये ६.८२ इंचाचा आयपीएस एलसीडी एचडी+ डिस्प्ले दिला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्झ आहे, या बजेटसाठी हा रिफ्रेश रेट चांगला आहे. Unisoc T606 प्रोसेसरसह यात ४जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. ४जीबी व्हर्च्युअल रॅमसह यातील एकूण रॅम ८जीबी पर्यंत वाढवता येतो.

डिव्हाइसच्या बॅक पॅनलवर १३ एमपी प्रायमरी आणि दुसरा व्हीजीए कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ह्यात ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा मिळतो. हा फोन अँड्रॉइड १३ वर चालतो. तर याची सर्वात मोठी खासियत यातील ७०००एमएएचची बॅटरी आहे जी १८वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

काही दिवसांपूर्वी आला itel P55T

आयटेल पी५५टी स्मार्टफोनचा 4GB RAM सह 128GB Storage मॉडेल ८,१९९ रुपयांमध्ये काही दिवसांपूर्वी लाँच करण्यात आला आहे. या डिवाइसमध्ये ६.६ इंचाचा एचडी+ डिस्प्ले पंच होल स्क्रीन आणि ९०हर्ट्झ रिफ्रेश रेटस मिळतो. यात ६,०००एमएएचची बॅटरी मिळते, जी १८वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि एक एआय कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन यूनिसोक टी६०६ ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे. तसेच ४जीबी रॅमला सपोर्ट करतो. आयटेल पी५५टी मध्ये १२८जीबी स्टोरेज देण्यात आली आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.