Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘शिवरायांचा छावा’ सिनेमानं दणक्यात सर केला बॉक्स ऑफिसचा गड, चार दिवसांत कमावले तब्बल…

11

मुंबई: दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा ‘शिवरायांचा छावा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. छत्रपती संभाजी महाराज म्हणजे असामान्य पराक्रमांचे अधिपतीच. इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांत कोरलं गेलेलं स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं अवघं आयुष्य हे एक धगधगतं अग्निकुंड. मोठ्या पडद्यावर संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा जीवनपट उलगडण्याचं शिवधनुष्य दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी उचललं आहे. सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच सिनेमाबद्दल मोठी उत्सुकता होती. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. या सिनेमानं चार दिवसांत तीन कोटींच्या जवळपास कमाई केली आहे.

अभिनेता भूषण पाटील यानं या सिनेमात मुख्य भूमिका म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. अनेक अभिनेत्यांनी या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती. पण या भूमिकेसाठी माझी निवड झाली, हे माझं सौभाग्यच आहे, असं तो म्हणतो. या भूमिकेसाठी शारीरिक आणि मानसिक अशी दुहेरी कसरत केल्याचंही त्यानं म्हटलंय.
केतकीच्या कानाखाली मारून मीच रडू लागले… मेघना एरंडेने सांगितला ‘टाईमपास’च्या शूटिंगचा तो किस्सा

सिनेमाच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर, sacnilk या वेब साइटवरच्या आकड्यांनुसार प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी सिनेमानं ०.६ कोटींची कमाई केली तर दुसऱ्या दिवशी सिनेमानं ०.९ कोटींचा गल्ला जमवला होता. तर तिसऱ्या दिवशी रविवार असल्यानं या सिनेमानं एक कोटीच्यावर कमाई केली. तर चौथ्या दिवशी सिनेमानं ०.६४ कोटींची कमाई केली आहे. तर सिनेमाची एकूण कमाई ही तीन ते साडेतीन कोटींच्या जवळपास आहे. हे आकडे येत्या आठवड्यात वाढतील असं म्हटलं जात आहे.

चित्रपटात महाराणी येसूबाई यांची भूमिका अभिनेत्री तृप्ती तोरडमल हिनं साकारली आहे , तर कवी कलश यांची व्यक्तिरेखा विक्रम गायकवाड यांनी साकारली आहे. बिपीन सुर्वे हा औरंगजेबाच्या छावणीतील गुप्तहेराच्या भूमिकेत आहे. सिनेमात बहिर्जी नाईक यांची व्यक्तिरेखा ही रवी काळे यांनी साकारली आहे. चित्रपटात औरंगजेब यांची भूमिका साकारली आहे समीर धर्माधिकारी यांनी.
तो आपल्यात फूट पाडतोय… तुरुंगात असलेल्या सुकेशचं जॅकलीनसाठी लव्ह लेटर, पत्रातल्या गोल्ड डिगरची चर्चा
‘शिवरायांचा छावा’ हा चित्रपट १६ फेब्रुवारी २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. मल्हार पिक्चर्स कंपनीचे वैभव भोर, किशोर पाटकर, मधू यांनी या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली आहे. सह-निर्मिती भावेश रजनीकांत पंचमतीया यांनी केली आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.