Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Samsung ने लाँच केले टच स्क्रीन लॅपटॉप; Galaxy Book4 सीरीज भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

7

Samsung Galaxy Book4 सीरीज भारतात लाँच झाली आहे. या सीरीजमध्ये कंपनीनं तीन लॅपटॉप Galaxy Book4 Pro 360, Galaxy Book4 Pro आणि Galaxy Book4 360 सादर केले आहेत. Samsung Galaxy Book4 Pro 360 आणि Book4 360 मध्ये टू-इन-वन डिजाइन देण्यात आला आहे. तसेच, Galaxy Book4 Pro मध्ये clamshell डिजाइन मिळते. स्पेसिफिकेशन पाहता सॅमसंग गॅलेक्सी बुक ४ प्रो 360 मध्ये १६ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच, बुक४ प्रो मध्ये १४ इंचाची स्क्रीन साइज आहे. बेस मॉडेल Galaxy Book4 360 मध्ये १५.६ इंचाचा sAMOLED FHD डिस्प्ले देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया यांची किंमत, उपलब्धता आणि स्पेसिफिकेशनची संपूर्ण माहिती.

Samsung Galaxy Book4 series ची किंमत

कंपनीनं Samsung Galaxy Book4 Pro 360 १,६३,९९० रुपयांमध्ये सादर केला आहे. हा मॉडेल सिंगल Moonstone Grey कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. Galaxy Book4 Pro ची किंमत १,३१,९९० रुपये आहे, ज्यात Moonstone Gray आणि Platinum Silver कलर ऑप्शन येतात. Book4 360 ची किंमत १,१४,९९० रुपये आहे, ज्यात ग्रे कलर ऑप्शन देण्यात आला आहे.

Samsung चे या तिन्ही लॅपटॉपची प्री-बुकिंग २० फेब्रुवारी म्हणजे उद्यापासून सुरु होईल. प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना ५००० रुपये पर्यंत बेनेफिट्स मिळतील. तसेच ग्राहकांना १०,००० रुपयांपर्यंतचा बँक कॅशबॅक किंवा ८००० रुपयांपर्यंतचा अपग्रेड बोनस मिळेल.

Samsung Galaxy Book4 चे स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन पाहता, Samsung Galaxy Book4 Pro 360 मध्ये १६ इंचाची Dynamic AMOLED २x स्क्रीन मिळते, जिचे रिजोल्यूशन २,८८० x १,८०० पिक्सल आहे. तसेच, Book4 Pro मध्ये १४ इंचाची Dynamic AMOLED २x स्क्रीन देण्यात आली आहे, जिचे रिजोल्यूशन २,८८० x १,८०० पिक्सल आहे. बेस Galaxy Book4 360 मॉडेलमध्ये १५.६ इंचाचा sAMOLED FHD डिस्प्ले देण्यात आला आहे. या लॅपटॉपमध्ये टच सपोर्ट देण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी बुक४ सीरीजचे लॅपटॉप Intel च्या लेटेस्ट Core Ultra प्रोसेसरसह आले आहेत. Book4 Pro 360 मध्ये Core Ultra 7 ऑप्शन मिळतो, सोबत 16GB LPDDR5x RAM देण्यात आला आहे. तसेच, दुसरीकडे Book4 Pro आणि Book4 360 मध्ये Core Ultra 7 व Ultra 5 व्हेरिएंट्स मिळतात. प्रो मॉडेलमध्ये 16GB व 32GB स्टोरेज ऑप्शन मिळतात. तसेच, बुक४ ३६० मॉडेलमध्ये सिंगल 16GB RAM मिळतो. त्याचबरोबर ५१२जीबी व १टीबी स्टोरेजचे ऑप्शन आहेत. ग्राफिक्ससाठी प्रो व्हेरिएंट्समध्ये Intel Arc डिजाइन देण्यात आला आहे, तसेच नॉन प्रो मॉडेल Intel Iris Xe GPU सह येतो.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.