Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

जगातील सर्वात पहिल्या आयफोनशी भिडणारी कंपनी आता होतेय बंद; स्मार्टफोन सोडून ‘या’ टेक्नॉलॉजीवर करणार काम

12

स्‍मार्टफोन मार्केटमध्ये टिकणं सोपं काम नाही. गेल्या काही वर्षांमध्ये एलजी सारखी मोठी कंपनी या व्यवसायातून बाहेर पडली होती. आता एक चिनी ब्रँड Meizu देखील स्‍मार्टफोन बिजनेस मधून बाहेर पडणार आहे. Meizu चे हक्क सध्या एका एक कार मेकर Geely कडे आहेत. रिपोर्टनुसार, स्‍मार्टफोन बिजनेस मधून बाहेर पडल्यावर Meizu आपलं सर्व लक्ष AI म्हणजे आर्टिफ‍िशियल इंटेलिजेंसवर केंद्रित करणार आहे. कंपनीच्या मते भविष्यात एआयचा वाटा मोठा आहे.

मेईझू ती कंपनी आहे जिने २००७ मध्ये आलेल्या Apple च्या सर्वात पहिल्या iPhone ला टक्कर देण्यासाठी त्यासारखाच दिसणारा आणि ३० टक्के स्वस्त विंडोज ओएस आधारित Meizu M8 स्मार्टफोन लाँच केला होता. विशेष म्हणजे या फोनला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. नंतर अ‍ॅप्पलनं कंपनीवर खटले दाखल करून मेईझू एम८ ची विक्री थांबवली.

एका वीबो पोस्‍ट आणि गिजमोचायनाच्या रिपोर्टनुसार, Meizu स्‍मार्टफोन्‍ससाठी FlymeOS डेव्हलप करणाऱ्या टीमला एआय टर्मिनल डिवाइसेस बनवण्यासाठी पुन्हा तयार केलं जाईल. रिपोर्ट नुसार, कंपनी एआयवर शिफ्ट होईल. विशेष म्हणजे याचा अंदाज कंपनीनं जेव्हा Flyme Auto ची घोषणा केली होती तेव्हाच लावण्यात आला होता. ही एक इंफोटेनमेंट सिस्टम आहे, जी Geely नं बनवलेल्या वाहनांमध्ये वापरली जाते. ही इंफोटेनमेंट सिस्‍टम Meizu 20 आणि Meizu 21 सारखे फ्लॅगशिप स्‍मार्टफोन्‍समधील FlymeOS 10 ओएसशी सहज कनेक्‍ट होते.

स्‍मार्टफोन बिजनेस मधून बाहेर पडण्यामागे कंपनीनं असं कारण दिलं आहे की स्‍मार्टफोन युजर्सना दीर्घकाळ अपग्रेड द्यावे लागतात. स्मार्टफोनवर सतत अपडेट देण्याबाबत बोलत आहे, अनेक मॉडेल्सवर ४ वर्षांपर्यंत अपडेट द्यावे लागतात.

यामुळेच कंपनी आता Meizu 21 Pro, Meizu 22 आणि Meizu 23 सीरीज लाँच करणार नाही. परंतु सध्या जे डिवाइस युजर्सकडे आहेत, त्यांना सपोर्ट मिळत राहील. जागतिक बाजारातील डिवाइसेस बाबत Meizu नं काही म्हटलं नाही. विशेष म्हणजे गेली अनेक वर्ष कंपनीनं चीनच्या बाहेर अनेक मार्केटमध्ये आपले फोन लाँच केले नाहीत. याचा अर्थ असा की या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम चीनी युजर्सवर होईल.
ही पहिलीच वेळ असेल जेव्हा एखादी स्‍मार्टफोन कंपनी एआयमुळे आपला फोन बिजनेस बंद करत आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.