Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

mla ashish shelar on ATS: दहशतवाद्यांना अटक; आमदार आशीष शेलारांनी एटीएसवर विचारला ‘हा’ प्रश्न

10

हायलाइट्स:

  • दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली.
  • यात मुंबईतील धारावीचा जान मोहम्मद शेख याला धारावीतून स्पेशल सेलने अटक केली.
  • यावरून भाजप आमदार आशीष शेलार यांनी महाराष्ट्र एटीएस आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबई: दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. यात मुंबईतील धारावीचा जान मोहम्मद शेख याला धारावीतून स्पेशल सेलने अटक केली. मुंबईत आणि राज्यात असे कट कारस्थान सुरु असताना महाराष्ट्र राज्याच दहशातवाद विरोधी पथक (एटीएस) झोपलंय का? असा सवाल भाजप नेते, आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. पोलिसांवर असलेल्या राजकीय दबावामुळे त्यांचे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष होतय असा आरोप ही त्यांनी यावेळी केला. (bjp mla ashish shelar ask question to maharashtra ats after arrest of terrorists by delhi police)

शेलार मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पोलिसांवरही टीकास्त्र सोडले. अदखलपात्र गुन्ह्याक केंद्रीय मंत्र्यांना अटक करणारे राज्याचे पोलिस, पत्रकारांना हात नाही पाय लावू अशी भाषा करणारे पोलिस, विद्यमान आमदाराला लुक आउट नोटीस काढण्याचा प्रताप करणारे पोलिस दहशतवाद्यांच्या बाबतीत का झोपले होते, हे गृहमंत्री स्पष्ट करतील का? असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे.

क्लिक करा आणि वाचा- ‘सरकारने आता तरी जागे व्हावे’; मराठा तरुणाच्या आत्महत्येनंतर संभाजीराजेंचे आवाहन

या दहशतवादी प्रकरणाची इंटेलिजन्स माहिती पोलिसांना, गृहमंत्र्यांनी होती तर मग एका विशिष्ट वर्गाबाबत मवाळ भूमिका असे राजकीय प्रकरण नाही ना? असा सवाल करत पोलिसांच्या इंटेलिजन्स फेल्युअरवर गृहमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

आता सरकार बैठका घेतल असले तरी झालेल्या अक्षम्य दुर्लक्षावर आता पांघरुण घालता येणार नाही. राजकर्ते पोलिसांचे लक्ष नको त्या विषयात वळवतात, त्यामुळे मग अशा घटना घडतात. आमचे पोलिस सक्षम आहेत पण राजकीय दबाव, सरकारची गटबाजी, वसुलेबाजी, आणि सौदेबाजी यामुळे ही स्थिती आली असे आरोपही त्यांनी केले आहेत.

क्लिक करा आणि वाचा- चिंता अधिकच वाढली; राज्यात आज करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ, मात्र ‘हा’ दिलासा!
क्लिक करा आणि वाचा- ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.