Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
६०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतील कपडे
अॅमेझॉन मार्केट प्लेसने आपल्या प्लॅटफॉर्मवर अनब्रँडेंड प्रोडक्ट्स आणि त्यांच्या सेलर्सना ऑनबोर्ड करण्यास सुरुवात केली आहे. असा दावा केला जात आहे की या प्लॅटफॉर्मवरून ग्राहक ६०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे वॉच, शूज, ज्वेलरी खरीद खरेदी करू शकतील. अशी चर्चा आहे की अॅमेझॉनची लो प्राइस वेबसाइटला सॉफ्टबँकची गुंतवणूक असलेल्या Meesho कडून टक्कर मिळेल. परंतु अॅमेझॉनचा मार्ग इतका सोपा असणार नाही, कारण या सेक्टरमध्ये अॅमेझॉनच्या समोर मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे देखील आव्हान आहे, जी लो प्राइस वेबसाइट AJio उभी करत आहे.
Meesho मॉडेल
अॅमेझॉन आपल्या लो प्राइस सेगमेंटच्या माध्यमातून छोटे वस्त्या आणि गावांवर लक्ष केंद्रित करण्याची योजना बनवत आहे. त्याचबरोबर आपले प्रोडक्ट स्वस्तात विकत यावेत म्हणून मर्चेंट म्हणजे विक्रेत्यांकडून झिरो रेफरल फी घेत आहे. तर Meesho द्वारे सरासरी ३००-३५० रुपयांच्या सेलिंग प्राइससह झिरो कमीशन घेत आहे. जर Meesho चा मॉडेल पाहता, Meesho कडे फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन प्रमाणे कोणतेही गोदाम देखील नाहीत. हा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म सेलर टू कंज्यूमर मॉडेलवर चालतो.
या मॉडेल मुळे Meesho ला गोदामाचे भाडे द्यावे लागत नाही, कंपनी त्यांच्याकडे आलेली सेलरला पाठवत असल्यामुळे साठवणूक आणि डिलिव्हरीचा खर्च Meesho ला करावा लागत आहे. म्हणूनच या प्लॅटफॉर्मवर वस्तू आणि कपडे स्वस्तात मिळतात. आता अॅमेझॉन मीशूच्या या मॉडेलला कशी टक्कर देतं ते पाहावं लागेल.