Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
iQOO Neo 9 Pro ची किंमत, उपलब्धता आणि ऑफर्स
कंपनीनं iQOO Neo 9 Pro तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये आला आहे. ज्यात ८जीबी रॅमसह २५६ जीबी स्टोरेजचा समावेश आहे ज्याची किंमत ३७,९९९ रुपये आहे. तर १२जीबी रॅमसह २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंट ३९,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तसेच ८जीबी रॅम +१२८जीबी ऑप्शनची देखील घोषणा करण्यात आली आहे, जो २१ मार्चपासून ३५,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध होईल. पहिले दोन मॉडेल उद्या म्हणजे २३ फेब्रुवारीपासून विकले जातील.
हे देखील वाचा:
लाँच ऑफर अंतगर्त युजर्सना १,००० रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट मिळेल. हा २६ फेब्रुवारी पर्यंतच हा उपलब्ध आहे. डिव्हाइसवर आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँक कार्डच्या मदतीनं २,००० रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट मिळेल. युजर्सना विवो, आयक्यू फोन्सवर ४,००० आणि अन्य वर २,००० रुपये पर्यंतचा एक्स्ट्रा एक्सचेंज बोनस देखील मिळेल.
iQOO Neo 9 Pro चे स्पेसिफिकेशन्स
iQOO Neo 9 Pro डिव्हाइसमध्ये ६.७८ इंचाचा १.५ के अॅमोलेड डिस्प्ले मिळत आहे. या स्क्रीनवर २८०० x १२६० पिक्सल रिजॉल्यूशन, ३००० निट्स पीक ब्राइटनेस, एचडीआर १० प्लस, १४४हर्ट्झ पर्यंतचा रिफ्रेश रेट, १.०७ बिलियन कलर, ४५२पीपीआय पिक्सल डेंसिटी, ९३.४३% स्क्रीन टू बॉडी रेश्योचा सपोर्ट देण्यात आला आहे. फोन अँड्रॉइड १४ आधारित फन टच ओएस १४ वर चालतो.
iQOO Neo 9 Pro मध्ये परफॉर्मन्ससाठी कंपनीनं ऑक्टा कोर क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८ जेन २ चिपसेट वापरला आहे. त्याचबरोबर ग्राफिक्ससाठी एड्रेनो ७४० जीपीयू देण्यात आला आहे. डिवाइसमध्ये १२ जीबी पर्यंत रॅमसह १२जीबी पर्यंत एक्सटेंडेड रॅमचा सपोर्ट मिळेल. म्हणजे की युजर्स एकूण २४ जीबी पर्यंत रॅमचा वापर करू शकतात.
कॅमेरा फीचर्स पाहता नवीन iQOO Neo 9 Pro ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह आहे. ज्यात ५० मेगापिक्सलची आयएमएक्स ९२० नाइट व्हिजन कॅमेरा लेन्स देण्यात आली आहे. त्याचबरोबर ८ मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेन्सचा सपोर्ट मिळतो. कॅमेऱ्यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशन देण्यात आलं आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
बॅटरीच्या बाबतीत iQOO Neo 9 Pro स्मार्टफोन ५१६०mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी चार्ज करण्यासाठी १२०वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. म्हणजे युजर्स काही मिनिटांत डिवाइस फुल चार्ज करू शकतात. अन्य फीचर्स पाहता iQOO Neo 9 Pro मध्ये आयपी५४ रेटिंग, ड्युअल सिम ५जी, वाय-फाय ७, ब्लूटूथ, ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर, एक्सीलरोमीटर, प्रॉक्सिमिटी सेन्सर सारखे अनेक फीचर्स मिळतात.