Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- गणेशोत्सवानिमित्त घरी बोलावून विवाहितेवर अत्याचार.
- नातेवाईकानेच केला महिलेवर अत्याचार.
- संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव गावातील धक्कादायक घटना.
आरोपी आणि पीडित महिला जवळचे नातलग आहेत. दोघेही विवाहित आहेत. जेवणाचे निमंत्रण आल्यावर महिला आपल्या कुटुंबातील काही सदस्यांसोबत आरोपीच्या घरी गेली होती. दुपारच्यावेळी जेवणाची पंगत सुरू होती. तेथे या महिलेने जेवण वाढण्याचे काम केले. नंतर आरोपीच्या पत्नीने घर झाडून घेण्यासाठी त्या महिलेला घराच्या तिसऱ्या मजल्यावरील खोलीतून झाडू आणण्यास पाठविले. त्यानुसार ती महिला झाडू आणण्यासाठी तिसऱ्या मजल्यावरील खोलीत गेली. तेव्हा आरोपी विशाल शेटे तिच्या पाठोपाठ गेला.
क्लिक करा आणि वाचा- ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
महिला आतमधून झाडू घेत असताना आरोपीने खोलीत जाऊन आतून दरवाजा बंद केला. त्यानंतर तिला धमकावत तिच्यावर अत्याचार केला. एवढ्यावरच आरोपी थांबला नाही. तिला म्हणाला की, ‘मी रात्री जेल्हा तुझ्या घरी येईल, तेव्हा दरवाजा उघडा ठेवत जा.’ वरच्या मजल्यावर हा प्रकार सुरू असताना खाली नातेवाईकांचे जेवण सुरू होते. ‘खाली गेल्यावर झाडू आणण्यास उशिरा का झाला असे कोणी विचारले तर मी मोबाईलवर व्यस्त होते, असे सांगायचे,’ असेही आरोपीने त्या महिलेला धमकावले होते.
क्लिक करा आणि वाचा- दहशतवादी जानचे डी कंपनीशी दोन दशकांपूर्वीचे संबंध; एटीएस पथक दिल्लीला जाणार
मात्र, नंतर त्या महिलेने हा प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितला. त्यावर त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी विशाल सोपान शेटे याच्याविरुद्ध अत्याचार केल्याचा आणि धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. मात्र, महिला व नातेवाईक पोलिस ठाण्यात गेल्याचे समजताच आरोपी तेथून निघून गेला. त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. नातेवाईकाकडूनच घरी जेवायला बोलावून भर दुपारी हा गुन्हा घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
क्लिक करा आणि वाचा- डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: न्यायालयात ३० सप्टेंबरला पुरावे सादर होणार