Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
९९ टक्के लोकांना माहीतच नाहीत WhatsApp वरील या ट्रिक्स; हटके पद्धतीनं मेसेज फॉरमॅट करून दाखवा तुमची स्टाइल
व्हॉट्सअॅपनं मेसेजिंगसाठी चार नवीन टेक्स्ट फॉर्मेट ऑप्शन सादर केले आहेत. टेक्स्ट फॉर्मेटिंगचे हे लेटेस्ट अॅडिशन युजर्सना अनेक प्रकारच्या मेसेजिंगमध्ये फायदा देतील. यांच्या मदतीनं मेसेज अधिक चांगल्या प्रकारे सादर करता येईल. तसेच वेळ वाचवण्यास देखील मदत करतील. तसेच मेसेजच्या माध्यमातून आता संवाद आधी चांगल्याप्रकारे करता येईल. बुलेट लिस्ट, नंबर्ड लिस्ट, ब्लॉक कोट्स आणि इनलाइन कोड तुमचा टेक्स्ट मेसेजिंग एक्सपीरियंस कशाप्रकारे इम्प्रूव करतील, याबाबत चला जाणून घेऊया.
Bulleted Lists
बुलेटेड लिस्ट फॉर्मेटचा वापर करून मेसेजमध्ये पॉइंट्स हाइलाइट करता येतील. उदाहरणार्थ तुम्ही मेसेजमध्ये एखादी यादी मेंशन करत असाल तर या बुलेट्सच्या माध्यमातून प्रत्येक साहित्य वेगळं हाइलाइट करू शकाल ज्यामुळे वाचकाला वाचताना सोपं वाटेल. या फॉर्मेटचा वापर करण्यासाठी “-” सिंबल नंतर नंतर स्पेस द्यावा लागेल.
Numbered Lists
नंबर्ड लिस्ट फॉर्मेट देखील बुलेटेड लिस्ट प्रमाणेच काम करेल परंतु इथे स्टेप्सला नंबर देखील देता येईल. म्हणजे एखाद्या कामात किती स्टेप्स आहेत हे नंबरच्या माध्यमातून वाचकाला समजाव्या म्हणून याचा वापर करता येईल. फॉर्मेट वापरण्यासाठी युजरला 1, 2, 3… असे नंबर करावे लागतील त्यानंतर पूर्णविराम आणि मग स्पेस द्यावा लागेल.
Block Quote
ब्लॉक कोट एखाद्या मेसेजमधील महत्वपूर्ण टेक्स्ट हाइलाइट करण्याच्या कामी येतो. याचा वापर करण्यासाठी > चिन्ह टाइप करून त्यानंतर स्पेस द्यावा लागेल.
Inline Code
इनलाइन कोड एखाद्या टेक्स्ट मेसेजमध्ये तेव्हा उपयुक्त ठरेल जेव्हा एखादी लाइन हाइलाइट करायची असेल. हे फॉरमॅटिंग वापरण्यासाठी युजर्सना शब्दाच्या सुरवातीला आणि शेवटी “`” हे चिन्ह स्पेसविना टाइप करावं लागेल. याचा फायदा कोडर्सना देखील चांगला करता येईल.
WhatsApp नुसार, फॉर्मेटिंग ऑप्शन Android, iOS, वेब आणि Mac युजर्ससाठी देखील उपलब्ध होतील. तसेच सर्व चॅनेल अॅडमिन देखील याचा वापर करू शकतील.