Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आर्थिक राशिभविष्य 24 फेब्रुवारी 2024 : या राशींसाठी ‘शनिवार’ सर्वोत्तम, प्रतिष्ठा वाढणार ! तुमची राशी काय सांगते? पाहा राशिभविष्य

9

Career Rashibhavishya, 24 फेब्रुवारी 2024 : मेष, वृषभ, कर्क, वृश्चिक,कन्या यांच्यासाठी दिवस सर्वोत्तम असून तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे. तसेच अधिकारात वृद्धी होणार आहे तर धनु राशीने सावध रहावे.तुमच्या राशीत शनिवारसाठी काय लिहिले आहे. मेष ते मीन राशीपर्यंत शनिवारचा दिवस आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने कसा जाईल ते पाहूया.

​मेष आर्थिक राशिभविष्य : चांगल्या कामामुळे प्रतिष्ठा वाढेल

मेष राशीच्या लोकांना नशिब साथ देईल. तुमच्या चांगल्या कामामुळे तुमची आणि तुमच्या कुटुंबाची प्रतिष्ठा वाढेल. तुमच्यात निर्णय घेण्याची क्षमता आहे, त्याचा तुम्हाला लाभ होईल. तुम्ही सामाजिक आणि धार्मिक कार्यात सहकार्य कराल. लोक तुमच्या योजनांची स्तुती करतील आणि तुमच्याबद्दल समाधानी राहतील. सन्मानात वृद्धी होईल आणि दिवस प्रसन्न जाईल.

​वृषभ आर्थिक राशिभविष्य : आईवडिलांचा आशीर्वाद घ्या

​वृषभ आर्थिक राशिभविष्य : आईवडिलांचा आशीर्वाद घ्या

वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल आणि संततीकडून समाधान लाभेल. संततीच्या यशामुळे आनंद होईल. घरातून बाहेर पडताना आईवडिलांचा आशीर्वाद घेतल्याने लाभ होईल. नोकरचाकर आणि संसारिक उपभोगांच्या साधनात वृद्धी होईल. उत्पन्नाचे नवे मार्ग मिळतील. सायंकाळचा वेळ देवदर्शन आणि पूर्णकार्यात व्यतित होईल.

​मिथुन आर्थिक राशिभविष्य : त्वरित निर्णय घ्या

​मिथुन आर्थिक राशिभविष्य : त्वरित निर्णय घ्या

मिथुन राशीच्या लोकांसाठी आज भाग्यवृद्धीचा दिवस आहे. एखादा खटला सुरू असेल तर यात तुम्हाला यश मिळेल. पण वेळ तुमच्यासाठी अनुकूल नाही. तुम्ही जर त्वरित निर्णय घेऊ शकला नाही तर कामात अडचणी येतील आणि नुकसान होईल. जर तुम्ही नोकरी करत असाल तर वरिष्ठांच्या कृपेमुळे अधिकारांत वृद्धी होईल. रात्रीचा वेळ कुटुंबासोबत आनंदात जाईल.

कर्क आर्थिक राशिभविष्य : पदोन्नती होईल

कर्क आर्थिक राशिभविष्य : पदोन्नती होईल

कर्क राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल. जर तुमची पदोन्नती रखडली असेल तर ती आवश्य होईल आणि व्यापारात फायदा होईल. एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याला स्वतःकडे आकर्षित करण्यात यशस्वी व्हाल. निर्णय घेण्याच्या क्षमतेचा तुम्हाला लाभ होईल. रात्री तिखट जेवण टाळा अन्यथा प्रकृती बिघडू शकते.

​सिंह आर्थिक राशिभविष्य : व्यापारात नवे बदल

​सिंह आर्थिक राशिभविष्य : व्यापारात नवे बदल

सिंह राशीच्या लोकांच्या सन्मानात वृद्धी होईल. जर तुम्ही व्यापारात असाल तर तुमच्या व्यापारात काही नवे बदल होतील. नोकरदार लोकांचे अधिकार वाढतील आणि तुमचा वेळ चांगला जाईल. तुम्हाला आर्थिक लाभ आणि सन्मान मिळेल. कुटुंबाकडून शुभवार्ता मिळेल. आज तुम्ही सामाजिक कार्यात आणि विलासी जीवनात व्यस्त राहाल. क्षमतेपेक्षा जास्त पैसे मिळाल्याने तुम्हाला अभिमान वाटेल.

​कन्या आर्थिक राशिभविष्य : अधिकारात वृद्धी होईल

​कन्या आर्थिक राशिभविष्य : अधिकारात वृद्धी होईल

कन्या राशीच्या लोकांना आजचा दिवस अनुकूल आहे आणि तुमच्या अधिकारांत वृद्धी होईल. स्वतःची प्रतिष्ठा जपण्यासाठी पैशाचा अपव्यय होऊ शकतो. तुम्ही इतरांचे कल्याण आणि सेवा मनापासून करता, याचा लाभ तुमच्या संततीला होईल. प्रकृती बिघडू शकते.

​तुला आर्थिक राशिभविष्य : विचारपूर्वक काम करा

​तुला आर्थिक राशिभविष्य : विचारपूर्वक काम करा

वृश्चिक राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल आणि तुम्हाला कोणतेही काम फार विचारपूर्वक करावे लागणार आहे. नुकसान होण्याची शक्यताही आहे. तुम्हाला आकस्मिक एखादा शासकीय दंड होऊ शकतो, त्यामुळे जोखिम घेऊ नका. सायंकाळी काही कारणांमुळे मानहानी होऊ शकते. वातसंबंधित विकार होऊन शारीरिक अडचणी वाढतील.

​वृश्चिक आर्थिक राशिभविष्य : पद आणि अधिकारांत वाढ

​वृश्चिक आर्थिक राशिभविष्य : पद आणि अधिकारांत वाढ

वृश्चिक राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होईल. एखाद्या बहुमूल्य वस्तूतून लाभ होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर पद आणि अधिकारांत वाढ होईल. तुमचे साहस आणि पराक्रम यात वृद्धी होईल. संततीबद्दल प्रेमभावना वाढेल. सायंकाळपर्यंत तप आणि ज्ञानसाधना यात रुची घ्याल. नोकरचाकरांचे सुख मिळेल.

​धनू आर्थिक राशिभविष्य : विश्वासघातापासून सावध राहा

​धनू आर्थिक राशिभविष्य : विश्वासघातापासून सावध राहा

धनू राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल. आजचा दिवस गुरूप्रति निष्ठा आणि भक्तीत जाईल. आध्यत्मातून तत्वज्ञानाची प्राप्ती होईल. तुम्ही तुमच्या बुद्धी आणि विवेकातून काही नवीन शोध लावाल. रखडलेले पैसे हाती येतील. सायंकाळी संततीला कष्ट होण्याची शक्यताआहे. तुमचा एखादा नोकरच विश्वासघात करण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावध राहा.

​मकर आर्थिक राशिभविष्य : पदोन्नती मिळेल

​मकर आर्थिक राशिभविष्य : पदोन्नती मिळेल

मकर राशीच्या लोकांना आज दिवस शुभ आणि तुमच्यात आज शारीरिक शक्ती आणि उत्साह जास्त राहील. पण काही अनावश्यक खर्चही येतील जे मनात नसतानाही तुम्हाला करावे लागतील. तुम्हाला कार्यालयात पदोन्नती मिळेल. तुमच्या हाती मोठ्या प्रमाणावर पैसा आल्याने आनंद होईल. शुभ कामात खर्च होईल आणि कीर्तीत वृद्धी होईल. वेगवान वाहनांपासून सावध राहा.

​मीन आर्थिक राशिभविष्य : आत्मविश्वास वाढेल

​मीन आर्थिक राशिभविष्य : आत्मविश्वास वाढेल

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र जाईल. जर तुम्ही एखाद्या वित्तसंस्थेकडून कर्ज घेऊ इच्छित असाल तर तुम्हाला सहजरीत्या कर्ज मिळेल. पण गुंतवणूक करताना फार काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत आणि ही गुंतवणूक यशस्वी करण्याचा प्रयत्न करा. तुमचे साहस आणि पराक्रम यामुळे आत्मविश्वास वाढेल.

​कुंभ आर्थिक राशिभविष्य : भौतिक सुखसुविधांत वृद्धी

​कुंभ आर्थिक राशिभविष्य : भौतिक सुखसुविधांत वृद्धी

कुंभ राशीच्या लोकांना आज लाभ होईल. पण आज तुम्ही सबुरी दाखवली पाहिजे, कारण घाईगडबडीत केलेल्या कामामुळे नुकसान होऊ शकते. तुमच्या भौतिक सुखसुविधांत वृद्धी होईल. नवनवीन कामात दिवस जाईल, त्याचा भविष्यात लाभ होईल. मुलांची नोकरी किंवा लग्न इत्यादी मंगलकार्यात केलेल्या प्रयत्नांत यश येईल.

अनिता किंदळेकर यांच्याविषयी

अनिता किंदळेकर
अनिता किंदळेकर

अनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.… Read More

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.