Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

परीविक्षाधिन पोलिस अधिक्षक यांचा अवैध वेश्याव्यवसायावर छापा…

47

परीविक्षाधिन पोलिस अधिक्षक दर्शन दुगड यांचे सुचनेनुसार रांजनगाव MIDC पोलिसांनी केला वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश…

पुणे(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पुणे ग्रामीण पोलिसांनी अवैध वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करून मिळालेली गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषण यांच्या आधारावर आरोपींना शिताफीने अटक करण्यात रांजणगाव MIDC पोलिसांना यश मिळाले आहे. या प्रकरणी फिर्यादी पोलिस उपनिरीक्षक रघुनाथ कुंडलिक शिंदे,नेमणुक उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, शिरुर विभाग, पुणे ग्रामीण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, (दि.22 फेब्रुवारी) रोजी फिर्यादी पोउपनि – रघुनाथ शिंदे  हे उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, शिरुर विभाग येथे हजर असतांना शिंदे यांना दर्शन दुगड.(भा.पो.से.) पुणे ग्रा. यांनी शिरुर पोलिस स्टेशन हद्दीतील न्हावराफाटा येथे पोलिस स्टाफसह हजर राहणे बाबत कळवले होते. तेव्हा शिंदे व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, शिरुर येथील पोलीस स्टाफ मधील पो.हवा. विनायक मोहिते, दिनेश कुंभार,परशुराम म्हस्के असे सर्व खाजगी वाहनाने न्हावरा फाटा येथे गेले असता सदर ठिकाणी दर्शन दुगड परीविक्षाधिन पोलिस अधिक्षक हे त्यांच्याकडील पोलिस स्टाफ मधील म.पो. हवा. रेखा टोपे, शिरुर पोलिस स्टेशन हे भेटले. त्यावेळी दर्शन दुगड यांनी पथकाला सांगीतले की, रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीतील मौजे कारेगाव मधील गुरुदत्त वडेवाले हॉटेलच्या पाठीमागील बाजुच्या एका तीन मजली इमारतीमधील तिस-या मजल्यावर इसम नामे बबलु साहु हा देहविक्रीचा अवैध व्यापार करीत आहे. त्याबाबत खातरजमा करावयाची आहे. अशी माहीती सांगितल्याने सदर ठिकाणी छापा टाकण्याकरीता पोउपनि शिंदे, दर्शन दुगड,पो.हवा.विनायक मोहिते, दिनेश कुंभार,परशुराम म्हस्के, म.पो.हवा. रेखा टोपे, हे सर्व दोन वेगवगेळ्या खाजगी वाहनाने कारेगावच्या हद्दीतील गुरुदत्त वडेवाले हॉटेल येथे गेले. सदर ठिकाणी दर्शन दुगड यांनी स्थानिक पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे व त्यांच्या स्टाफला सदर घटनास्थळी बोलावुन घेतले. व प्राप्त गोपनिय माहितीची हकीकत त्यांना कळविली. त्यावेळी पो.हवा. विनायक मोहिते यांच्या मार्फत दोन पंचाना बोलावुन. सदर मिळालेल्या माहितीचा आशय दर्शन दुगड सो. (भा.पो.से) यांनी सोबतचे पंच व पोलिस स्टाफला समजावुन सांगितला

त्या नंतर पोलिस पथक कारेगावचे हद्दीतील हॉटेल गुरुदत्त वडेवाले चौकातुन सोबतच्या पोलिस स्टाफ दोन वेगवेगळ्या खाजगी वाहनाने माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा टाकण्याकरीता तयार झाले, पथकात असणारे पो.हवा. विनायक मोहिते यांनी बनावट ग्राहक पाठवुन त्याप्रमाणे त्यांचेकडे किंमत 2000/-रु. रक्कमेच्या 500/रु. दराच्या अशा चार नोटा देवून ती देहविक्री चालु असल्यास त्या मोबदल्यात देणे कामी व इशारा देणेकामी कळविले. त्या नंतर बनावट ग्राहकयास तिस-या मजल्यावर पाठविले. त्यानंतर काही वेळाने बनावट ग्राहकाने पथकाला इशारा केला. त्या मिळालेल्या इशाऱ्या प्रमाणे माहिती हि खरी असल्याची खात्री करुन त्याठिकाणी छापा टाण्याकरीता सदर इमारतीच्या तिस-या मजल्यावर रात्रौ 11 वा चे दरम्यान छापा टाकला असता इमारती मधील खोली क्र.20 मध्ये जाऊन पाहिले असता सदर ठिकाणी पोलिसांना दोन इसम आढळुन आले त्यांना त्यांचे नाव, पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव

(1) अर्जुन रामसमुझ वर्मा (वय 24 वर्षे), सध्या रा.कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे. मुळ रा.पुरेफेरी, सराया महेशा, तिलोई, जि.रायबरेली, उत्तर प्रदेश

(2) मंगलसिंग संतोषसिंग गैहलोत (वय 33 वर्षे), सध्या रा.कारेगाव, ता. शिरुर, जि.पुणे. मुळ रा.शिवनी खदान, ता.जि. अकोला

असे सांगितले त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्यापैकी अर्जुन रामसमुझ वर्मा याच्या खिशात एकुण 2000/रु. रक्कमेच्या 500 रु. दराच्या चार नोटा मिळुन आल्या. सदरची रक्कम सोबतच्या पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आली. त्यानंतर सदर खोलीच्या बाजुच्या खोली क्र. 21 मध्ये जाऊन पाहिले असता त्यामध्ये बनावट ग्राहक एका महिलेसोबत आढळुन आले. त्यांचे ताब्यात दोन कंडोम पॉकेट मिळून आले. ते त्यांना अर्जुन रामसमुझ वर्मा याने दिले असल्याचे सांगितले. सदर महीलेस विचारपुस केली असता तिने बबलू दुखबंधु साहु सध्या रा.कारेगाव, ता.शिरुर, जि.पुणे हा त्यांना देहविक्री करण्यास लावीत होता, अशी माहिती तिने सांगितली.

सदर या छाप्यामध्ये 2000/- रु. रोख रक्कम त्यामध्ये 500/रु. दराच्या चार नोटा, 15000/-रु. एक वन प्लस कंपनीचा मोबाईल किंमत 10,000/-रु. एक ओप्पो कंपनीचा मोबाईल आणि कंडोम पॉकिट असा  एकूण 27,300/- रु. मुद्देमाल मिळून आला आहे.वरीस सर्व आरोपींविरोधात पोलिस स्टेशन रांजनगाव MIDC येथे PITA Act 3,4,5,7 IPC 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील कार्यवाही रांजनगाव MIDC पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे करीत आहेत

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक पंकज देशमुख,अप्पर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे,यांचे आदेशाने परीविक्षाधीन पोलिस अधिक्षक दर्शन दुगड यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि रघुनाथ शिंदे,पोहवा विनायक मोहिते, दिनेश कुंभार,परशुराम म्हस्के, म.पो.हवा. रेखा टोपे यांनी केली

Leave A Reply

Your email address will not be published.