Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Xiaomi Pad 6s Pro चे स्पेसिफिकेशन्स
हा शाओमी टॅब ३०४८ × २०३२ पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या १२.४ इंचाच्या मोठ्या स्क्रीनला सपोर्ट करतो. हा ३के डिस्प्ले आहे जो एलसीडी पॅनलवर बनला आहे तसेच १४४हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालतो. सोबत ९००निट्स ब्राइटनेस, १४००:१ कॉन्ट्रास्ट रेशियो, एचडीआर१०+, डॉल्बी तसेच कोर्निंग गोरिल्ला ग्लास ५ चे प्रोटेक्शन मिळते.
Xiaomi Pad 6s Pro कंपनीनं हायपर ओएससह बाजारात आणला आहे. प्रोसेसिंगसाठी हा डिवायस क्वॉलकॉमच्या ४नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला स्नॅपड्रॅगन ८ जेन २ ऑक्टाकोर प्रोसेसरला सपोर्ट करतो. तसेच ग्राफिक्ससाठी या टॅबलेटमध्ये एड्रेनो ७४० जीपीयू आहे. सोबत १६जीबी पर्यंत रॅमसह १टीबी पर्यंतची स्टोरेज आहे.
फोटोग्राफीसाठी हा टॅबलेट डिवाइस ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर एलइडी फ्लॅशसह ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो २ मेगापिक्सलच्या डेप्थ सेन्सरसह मिळून चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Xiaomi Pad 6s Pro मध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
पावर बॅकअपसाठी शाओमी पॅड ६एस प्रो टॅबलेट डिव्हाइसमध्ये शाक्तिशाली १०,०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी हा डिव्हाइस १२०वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह लाँच करण्यात आला आहे.
या शाओमी टॅबलेटमध्ये ६ स्पिकर देण्यात आले आहेत जे डॉल्बी अॅटमॉसला सपोर्ट करतात. सिक्योरिटीसाठी यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे तसेच कनेक्टिव्हिटीसाठी टाइप सी पोर्ट, ब्लूटूथ ५. आणि वाय-फाय ७ आहे.
Xiaomi Pad 6s Pro ची किंमत
चीनमध्ये हा शाओमी टॅब ४ व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. तसेच ८जीबी+२५६जीबीची किंमत ३२९९ युआन म्हणजे ३८,६९९ रुपयांच्या आसपास आहे. तर १२जीबी रॅमसह २५६जीबी मॉडेल ३५९९ युआन (सुमारे ४२,१९९ रुपये) आणि ५१२जीबी मॉडेल ३९९९ युआन (सुमारे ४६,८९९ रुपये) मध्ये लाँच झाला आहे. सर्वात मोठा मॉडेल १६जीबी व १टीबी व्हेरिएंटची किंमत ४४९९ युआन म्हणजे ५२,७९९ रुपयांच्या आसपास आहे.