Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
३,००० रुपयांनी कमी झाली OnePlus 11R ची किंमत
वनप्लसनं गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये वनप्लस ११आर स्मार्टफोन लाँच केला होता. लाँचच्या वेळी फोनच्या ८जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३९,९९९ रुपये होती. तर १६जीबी रॅम व २५६जीबी स्टोरेज मॉडेल ४४,९९९ रुपयांमध्ये लाँच झाला होता.
आता स्मार्टफोनच्या ८जीबी व्हेरिएंटची किंमतीत २,००० रुपयांची कपात झाली आहे आणि आता हा ३७,९९९ रुपयांमध्ये विकत घेता येईल. दुसरीकडे १६जीबी व्हेरिएंटची किंमतीत ३,००० रुपयांची कपात झाली आहे आणि हा ४१,९९९ रुपयांमध्ये विकला जात आहे. ग्राहक वनप्लस ११आर गॅलेक्टिक सिल्व्हर आणि सोनिक ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. त्याचबरोबर कंपनी ICICI बँक क्रेडिट कार्डवर १,००० रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट देखील देत आहे.
OnePlus 11R चे स्पेसिफिकेशन्स
फोनमध्ये ६.७४ इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे रेजोल्यूशन २७७२×१२४० पिक्सल आहे. फोन १२० हर्टझ डायनॅमिक रिफ्रेश रेटच्या सपोर्टसह येतो. फोनमध्ये १४५० नीट्झची पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. फोन ऑक्टाकोर स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 चिपसेटसह बाजारात आला आहे. हा नवीन वनप्लस अँड्रॉइड १३ आधारित OxygenOS 13 वर चालतो.
ह्यात ड्यूअल नॅनो सिम देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी कंपनीनं ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात ५० मेगापिक्सलचा मेन कॅमेरा सेन्सर आहे, सोबत ८ मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेन्स देण्यात आली आहे. तसेच २ मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा मिळतो. फोनच्या फ्रंटला १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावरबॅकअपसाठी ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर १०० वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.