Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
स्वस्त स्मार्टवॉच कंपन्यांना टक्कर देण्यासाठी Samsung मैदानात! ५ हजारांच्या बजेटमध्ये Galaxy Fit3 भारतात लाँच
Samsung Galaxy Fit3 Price in India
Samsung Galaxy Fit3 ग्रे, सिल्वर आणि पिंक गोल्ड कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करता येईल. याची किंमत ४९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा Samsung.com सह अनेक रिटेल स्टोर्सवर उपलब्ध झाला आहे. कंपनी मर्यादित कालावधीसाठी ५०० रुपयांचा कॅशबॅक देखील देत आहे, त्यामुळे याची किंमत ४,४९९ रुपये होते.
Samsung Galaxy Fit3 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy Fit3 मध्ये १.५७ इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. हा ट्रॅकर १०० पेक्षा जास्त वॉच फेसेसना सपोर्ट करतो. सॅमसंगनं ट्रॅकरच्या बॅटरी साइजची माहिती दिली नाही, परंतु ही बॅटरी फुल चार्जवर १३ दिवस चालेल, असा दावा कंपनीनं केला आहे.
Galaxy Fit3 युजरचा हार्ट रेट मॉनिटर करतो, झोप कॅल्क्युलेट करतो, तणाव मॉनिटरिंग करतो आणि एक्सरसाइजवर देखील लक्ष ठेवतो. यातून ट्रॅक केला जाणारा डेटा तुम्ही Samsung Health अॅपवर बघू शकता. यात जीपीएस कनेक्टिव्हिटी मिळत नाही, परंतु कंपनीनं एक्सेलेरोमीटर आणि जायरोस्कोप सारख्या सेन्सरचा वापर केला आहे.
Galaxy Fit3 मध्ये रिमोट कॅमेरा, फाइंड माय फोन, इमरजेंसी एसओएस, फॉल डिटेक्शन, डू नॉट डिस्टर्ब मोड आणि स्लीप मोड सारखे फीचर्स मिळतात. हा व्हॉइस कॉलिंगला सपोर्ट करत नाही. पाणी आणि धुळीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी यात आयपी६८ रेटिंग देण्यात आली आहे. हा फिटनेस ट्रॅकर त्या लोकांसाठी योग्य आहे ज्यांचे जास्त बजेट नाही.