Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Google Pay जून मध्ये होणार बंद; ‘या’ महिन्यात काढता येणार पैसे, भारतीयांना घाबरण्याचे कारण नाही

10

Google Wallet आल्यानंतर ‘GPay’ हे नाव प्रत्येकाच्या ओठी येऊ लागलं. भारतात तर युपीआय पेमेंटला प्रतिशब्द म्हणून ‘जी पे करू का?’ असं विचारलं जातं. परंतु आता कंपनीनं पेमेंट अ‍ॅप बाबत मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत जुनं गुगल पे अ‍ॅप बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी कंपनीनं युजर्सना गुगल वॉलेटचा पर्याय देखील दिला आहे आणि लवकरात लवकर स्विच करण्यास देखील सांगितलं आहे.

कंपनीनं आपल्या एका ब्लॉग पोस्टमध्ये सांगितलं आहे की युनाइटेड स्टेट्समध्ये गुगल पे अ‍ॅप बंद केलं जात आहे. या अ‍ॅप्लिकेशनचं स्टॅन्डअलोन व्हर्जन ४ जून २०२४ पासून काम करणार नाही, त्यामुळे युजर्सनी Google Wallet वर स्विच करावं. अ‍ॅप सोबत पियर-टू-पियर फिचर देखील जाणार आहे, तसेच प्लॅटफॉर्मवर ऑफर्स आणि डील्स शोधता येणार नाही, तसेच बॅलन्स देखील मॅनेज करता येणार नाही. भारत आणि सिंगापूर सारख्या देशांमधील अ‍ॅप मात्र बिनदिक्कत सुरु राहील.
हे देखील वाचा: परदेशात जाताय! वापरा UPI पेमेंट, सविस्तर माहिती जाणून घ्या…

गुगलनं सांगितलं की, गुगल पेचा वापर १८० देशांमध्ये कोट्यवधी लोक करत आहेत, ज्यात क्रोमओएस, मॅक ओएस आणि विंडोज पीसीवरील डेस्कटॉप व्हर्जनचा समावेश आहे. परंतु मोबाइलवर गुगल पे गुगल वॉलेट इकोसिस्टमचा भाग आहे, ज्यासाठी अँड्रॉइड आणि आयओएसवर एक वेगळं अ‍ॅप देखील आहे.

वॉलेट ही कंपनीची मुख्य सर्व्हिस आहे जी पेमेंट कार्ड, ट्रॅव्हल पास, ओळखपत्र आणि ड्रायविंग लायसन्स सुरक्षितरित्या साठवून ठेवते. अमेरिकेत गुगल पे पेक्षा गुगल वॉलेट ५ पट जास्त वापरलं जातं. त्यामुळे ज्या गुगल पे युजर्सच्या अ‍ॅप्लिकेशनमध्ये बॅलन्स असेल त्यांनी तो ४ जून पूर्वी बँक अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करून घ्यावा असं कंपनीनं सांगितलं आहे. तर डील्स शोधण्यासाठी यूएस मध्ये गुगल सर्चवर एक वेगळं सेक्शन दिलं जाईल.

भारतात गुगल पेचा साउंडबॉक्स आला

गुगलनं भारतात आपला SoundPod रोलआऊट करण्यास सुरुवात केली आहे. हा एक वायरलेस स्पीकर आहे जो युपीआय पेमेंटच्या कन्फर्मेशनची माहिती मर्चंटला देतो. गेल्यावर्षी कंपनीनं या डिवाइसची टेस्टिंग सुरु केली होती. या साउंडपॉड मध्ये एक एलईडी स्क्रीन आणि सिंगल स्पीकर मिळतो. हा ४जी कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो. यातील एलईडी इंडिकेटर बॅटरी स्टेट्स, चार्जिंग आणि कनेक्टिव्हिटी स्टेट्स दाखवतो. तसेच यात मेन्यू, व्हॉल्युम आणि पावर बटन्स देखील आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.