Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
जबरी चोरीच्या गुन्हयातील आरोपीस कळमेश्वर पोलिसांनी केले जेरबंद….
कळमेश्वर(नागपुर) ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, फिर्यादी संजय मधुकर चौव्हाण, वय ४५ वर्ष, रा. नवटे, पोस्ट- हरचेरी, ता. जि. रत्नागिरी, ह. मुसकोहळी-मोहळी शिवार, कोहळी ता. कळमेश्वर, जि. नागपूर यांचे मालक गंगाराम चाटीला रा. गोरेगाव मुंबई यांना उप मध्य विदयुत अभियंता मध्य रेल्वे ऑफिस नागपूर यांचे कडून कोहळी कळमेश्वर या दरम्यान तिसऱ्या रेल्वे ट्रॅकचे लाईनवर ईलेक्ट्रीक ओव्हर हेड वायरचे कामाचे टेंडर मिळाल्याने सदर ठिकाणी फिर्यादी हे सुपरवायझर म्हणून काम करत आहे
सदर कामाचे सामान ठेवण्या करिता राजेंद्र पांडुरंग तापसे रा. मोहळी यांचे रूम भाडयाने केले होते. सदर रूमचे परिसरात सदर
रेल्वेचे कामा करिता लागणारी तांब्याची कटनरी कॉपर वायर व कॉन्टॅक्ट कॉपर वायर ठेवलेली होती. सदर ठिकाणी ठेवलेली
वेगवेगळी तांब्याचे वायर पैकी शिल्लक १००० मीटर कि. २,४८,००० रू. चा. कटनरी कॉपर वायर सदर रूमचे बाहेर खुल्या
जागेत ठेवलेली होती. सदर वायर ठेवलेले ठिकाणी नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर सदर वायर चोरीला गेली असल्याचे
दिसून आल्याने अज्ञात व्यक्तीचे विरोधात पो.स्टे. कळमेश्वर येथे अप क्र. ९५७ / २०२३ कलम ३७९ भादवि गुन्हा दाखल करून तपास सुरु होता
नमुद गुन्हयाचे तपासात तांत्रीक तपास करुन आरोपी क्र
०१)धर्मेंद्र रामगोपाल शाहू वय २१ वर्ष, रा. गंगानगर दिपक किराणा जवळ,गिट्टीखदान, नागपूर
०२) अनिलकुमार किशोरीलाल शाहु, वय २७ वर्ष, रा. गॅम्लर, टेलर्स च्या बाजुला, गिट्टीखदान
नागपूर यांचे कडून चोरीला गेलेले माला पैकी त्यांनी विकत घेतलेली एकूण १९ किलो तांब्याची तार जप्त करून त्यांना नमुद
गुन्हयात अटक करण्यात आली होती. त्यांनी नमुद माल हा अनोळखी ईसमांकडून विकत घेतला असल्याचे सांगितले होते.
पो. स्टे. कळमेश्वर कलम अप क्र ९७५ / २०२३ कलम ३९२, ३९५, ३९८, ३४२, ४५८, ४११, ३४ भादंवि तसेच या गुन्ह्यांतील आणखी काहींचा सहभाग असल्याचे कळताच उर्वरीत आरोपी यांचे शोधकामी विविध पथके गोपनियरित्या माहीती गोळा करीत होती त्यानुसार मिळालेल्या माहीतीनुसार यातील काही आरोपी हे चंद्रपुर पोलिसांचे ताब्यात असल्याचे कळले त्यावरुन उर्वरित आरोपींना चंद्रपुर पोलिसांकडुन प्रोड्युस रिमांड वर ताब्यात घेऊन यातील
गुन्हयाचे तपासात आरोपी नामे
नौशाद सादतुल्ला कुरेशी, वय ३२ वर्ष, रा. वार्ड न. ०२. आमराई वार्ड, बैंक ऑफ इंडियाचे मागे, घुगुस, ता. जि. चंद्रपुर
यास अटक करून विचारपूस केली असता नमुद आरोपी याने पो. स्टे कळमेश्वर अप. ९५७/२०२३ कलम ३७९ भादंवी गुन्हयात घटनास्थळावरून अन्य व्यक्तींसह येवून चोरी करून आरोपी नामे –
नूर अहमद अब्दुल कुरेशी, वय ३६ वर्ष, रा. बिमबा गेट, बिलाल कॉलनी ता. जि. चंद्रपूर
याने दिलेले पीकअप वाहनाने सदर मुद्देमाल चंद्रपूर येथे नेवून आरोपी नूर अहमद अब्दुल कुरेशी याला विकल्याचे त्याने चौकशी दरम्यान सांगितले.
त्याने नमुद गुन्हयात चोरी करणेकरीता वाहन दिल्याचे व चोरीचा माल विकत घेतल्याचे कबूल केल्याने त्याला पो. स्टे. कळमेश्वर येथे आणून नमुद गुन्हयात दिनांक २१/०२/२०२४ रोजी अटक केले. आरोपी नूर अहमद अब्दुल कुरेशी याने सांगितल्याप्रमाणे गुन्हयात चोरीला गेलेला माला पैकी ४७५ किलो, की अंदाजे २,८५,००० रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कार्यवाही ही पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ,उपविभागिय पोलिस अधिकारी,सावनेर अनिल मस्के यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे कळमेश्वर येथील ठाणेदार पोलिस निरीक्षक योगेश कामाले,पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलते, पोलिस शिपाई मनीष सोनोने, विवेक गाडगे, हितेश चौधरी, हेमंत चौधरी यांनी पार पाडली.