Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
रेल्वे स्टेशन्सवर Free WiFi चा वापर कसा करायचा
- तुमच्या स्मार्टफोनवर वायफाय सेटिंग ओपन करा
- उपलब्ध नेटवर्क शोधा
- त्यातून रेलवायर नेटवर्कची निवड करा आणि त्यावर टॅप करा
- त्यांनतर तुम्हाला साइन इन करण्यास सांगितले जाईल, त्यासाठी तुमच्या मोबाइल ब्राऊजरवर railwire.co.in वेबपेज ओपन करा.
- साइन करण्यासाठी तुमचा १० अंकी मोबाइल नंबर नोंदवा.
- त्यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल.
- रेलवायरशी कनेक्ट करण्यासाठी पासवर्ड म्हणून ओटीपीचा वापर करा.
- अशाप्रकारे तुम्ही रेलवायरशी कनेक्ट व्हाल आणि मोफत इंटरनेटचा वापर करू शकाल.
हे देखील वाचा:
अर्धा तास फ्री आहे इंटरनेट त्यानंतर द्यावे लागतील पैसे
रेल्वेच्या या वायफायचा वापर फक्त रेल्वे स्टेशनवर करता येईल. ट्रेन सुरु असताना ही सेवा उपलब्ध होणार नाही. रेलटेल किंवा रेलवायरच्या नावाने रेल्वे स्टेशनवर वाय फाय उपलब्ध होईल. ज्याचा लोक फक्त अर्धा तास मोफत वापर करू शकतील. अर्ध्या तासानंतर देखील जर तुम्हाला इंटरनेट वापरायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. रेलवायरनं प्रवाशांसाठी १० रुपयांपासून सुरु होणारे इंटरनेट पॅक सादर केले आहेत.
डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढवण्याचा प्रयत्न
रेल्वे स्टेशनवर मोफत वायफाय देऊन सरकारला देशातील डिजिटल कनेक्टिव्हिटीला चालना द्यायची आहे. तसेच रेल्वे स्टेशनवर मोफत वायफाय उपलब्ध झाल्यामुळे प्रवाशी ट्रेनची वाट पाहत असताना त्यावेळचा वापर आपली कामे पूर्ण करण्यासाठी किंवा प्रियजनांशी संपर्क साधण्यासाठी करू शकतात.