Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुणे येथील कोयता गॅंगचा सदस्य अवैध शस्त्रासह चाळीसगाव शहर पोलिसांचे ताब्यात…

8


पुणे येथील कोयता गॅंगचा सदस्य अवैध शस्त्रासह चाळीसगाव शहर पोलिसांचे ताब्यात…




गावठी बनावटीचे पिस्तुल (कट्टे) बाळगणाऱ्या पुण्यातील कोयता गँगच्या फरार आरोपीस चाळीसगाव शहर पोलिसांनी केले जेरबंद….

चाळीसगाव(जळगाव) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि.(२४) रोजी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करत असताना चाळीसगाव शहर पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहीती वरुन इसम ऋषिकेश ऊर्फ
मायकल व त्याचे वडील दिपक भटु पाटील रा. श्रीकृष्ण नगर करगांव रोड, चाळीसगांव त्याच्या राहत्या घरात हत्यारे बाळगत असले बाबत माहिती मिळाली होती त्यावरुन त्याच्या घराची पाहनी केली असता घरात एक गावठी पिस्टल त्यात एक जिवंत काडतुस व चॉपर मिळुन आले.
सदर हत्यारे ही त्याने निखील जगन्नाथ शिंदे उर्फ बंडी निक्या रा लक्ष्मीनगर, येरवडा पुणे व त्याच्या मित्राकडुन २१५००/- रु विकत घेतल्याची माहिती दिली तरी तो आता चाळीसगाव शहरात वास्तव्यास राहत असल्याची माहिती प्राप्त झाल्यावर त्यास पळुन जाण्याची संधी न देता अटक करण्यात आली निखील जगन्नाथ शिंदे उर्फ बंडी सराईत गुन्हेगार असुन तो येरवाडा पुणे येथील कोयता गँगचा सदस्य आहे. सदर कोयता गँग मधील सदस्यांनी दिनांक २५/१२/२०२३ रोजी रात्रीच्या सुमारास लक्ष्मीनगर,येरवडा पुणे या भागात हातात कोयते, तलवारी व दगड घेवुन सुमारे ३०ते३५ वाहनांच्या काचा फोडुन परिसरात दहशत निर्माण केली होती सदरबाबत पोलिस स्टेशन येरवडा येथे गुन्हा नोंद असुन सदर गुन्हयात गुन्हा घडल्यापासुन निखील शिंदे उर्फ बंडी निक्या हा फरार होता.
सदर आरोपींविरुध्द चाळीसगांव शहर पो.स्टे. येथे गुरनं ८१/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, ४/२५ २९ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम ककलम ३७ (१)(३)चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा नोद करण्यात आलेला असुन सदर आरोपीस अटक करुन ताब्यात घेतले पुढील तपास पोउपनि योगेश माळी,कल्पेश पगारे चाळीसगाव शहर पोलिस करीत आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी,अपर पोलिस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, सहा पोलिस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांचे मार्गदर्शनाखली पोलिस निरीक्षक संदिप पाटील, पोउपनि योगेश माळी, नापोशि दिपक पाटील,पोशि अमोल भोसले,
विनोद खैरनार, योगेश बेलदार, विनोद भोई, नितीश पाटील निलेश पाटील नंदकिशेर महाजन,मनोज चव्हाण, मपोहवा विमल सानप यांनी  केली





Leave A Reply

Your email address will not be published.