Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातुन अवैधरित्या विक्री करीता येणारा प्रतिबंधीत गुटखा पकडला,वाहनासह २३,००,८००/- रू चा मुद्देमाल केला जप्त….
यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यवतमाळ जिल्हयात कोणतेही प्रकाराचे अवैध धंदे सुरू राहणार नाहीत व अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन व्हावे याकरिता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते त्याच अनुशंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यांचे अधिनस्थ पथकांना अवैध धंद्याची गोपनिय माहिती काढुन प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या होत्या.
त्याअनुषंगाने दि.(२४) रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक पो.स्टे उरमखेड हददीत पेट्रोलींग करीत असतांना सकाळी ०५/०० वाजण्याचे सुमारांस मुखबिरव्दारे गोपनिय माहिती मिळाली कि, ढाणकी ते उमरखेड रोडवरून ढाणकी बाजूकडून एक महीद्रा बलोरो पिकअप वाहन क्रमांक एम. एच २६ बि.ई ८१२० मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधीत तंबाखु, गुटखा, पानमसाला मोठया प्रमाणावर भरून वाहतुक करीत आहे. अशा गोपनिय माहिती मिळाल्याने पथकाने दोन पंचा समक्ष गोपिकाबाई गांवडे महाविद्यालय रोडवर येथे नाकाबंदी केली असता ढाणकी-उमरखेड रोडन ढाणकी बाजूकडून एक महीद्रा बलोरो पिकअप वाहन क्रमांक एम. एच २६ बि.ई ८१२० ही येत असतांना दिसल्याने त्यास हातावारे करून रोडच्या साईटला थांबवून सदर वाहनात काय आहे यांची पाहणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधीत तंबाखु, गुटखा, पानमसाला मिळून आल्याने चालकांस पंचा समक्ष नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव १) युनूस खान अन्सार खान वय ३३ वर्षे, रा.उमरचौक हिमायतनगर, ता. हिमायतनगर जि.नांदेड २) विक्रम शंकर कराळे वय २३ वर्षे, रा.
जांमबाजार ता. पुसद जि.यवतमाळ असे सांगीतले वरून वाहनचालकास गाडी मध्ये काय माल आहे याची पाहणी केली असता सदर वाहनामध्ये एकुण २३,००,८०० /- रू किमंतीचा महाराष्ट्र राज्यात विक्री/वाहतुक/साठवणुक/वितरण/उत्पादन करण्यास प्रतिबंध असलेला सुगंधीत तंबाखु जन्य पदार्थ मिळुन आल्याने पंचा समक्ष ताब्यात घेवून पुढील कायदेशीर कारवाई करिता मा. श्री. अमितकुमार अशोककुमार उपलप, अन्न व औषध प्रशासन यवतमाळ यांना पाचारण करून त्यांचा लेखी फिर्याद वरून
पोलिस स्टेशन उमरखेड येथे आरोपी नामे १) युनूस खान अन्सार खान वय ३३ वर्षे, रा.उमरचौक हिमायतनगर, ता. हिमायतनगर
जि.नांदेड २) विक्रम शंकर कराळे वय २३ वर्षे, रा.जांमबाजार ता. पुसद जि.यवतमाळ ३) सय्यद आमेर सच्यद खमर वय ४०
वर्षे, रा. चौपाटी परमेश्वर मंदीर जवळ हिमायतनगर जि.नांदेड याचे वर मानवी सेवनास अपायकारक व नशाकारक अन्न पदार्थाचा
विक्री करिता वाहतुक करणे संबंधीअन्न व सुरक्षा मानके कायदा २००६ नियम व नियमने २०११ कलम २६ (२) (आय), २७(३)(ई) सहवाचन कलम ३० (२) (ए) चे उल्लंघन करुन कलम ५९ चा भंग तसेच त्यांनी भादवी कलम ३२८, २७२, २७३, १८८, ३४ भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड,अपर पोलिस अधीक्षक, पियुश जगताप,उपविभागीय पोलिस अधिकारी उमरखेड हनुमंतराव गायकवाड,पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनुने,स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांच्या मार्गदर्शनात सपोनि गजानन गजभारे, पोउपनि अमोल राठोड, चापोउपनि रेवन जागृत, पोहवा तेजाब रणखांब,सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड, पोशि मोहम्मद ताज, सुनिल पंडागळे, सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वी रित्या पारपाडली.