Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

iPhone 15 ला विसरा! अँड्रॉइड पेक्षा स्वस्तात मिळत आहे iPhone 14, जाणून घ्या ऑफर

9

iPhone 15 सीरीज गेल्यावर्षी लाँच करण्यात आली होती. त्यानंतर iPhone 14 च्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली होती. त्यामुळे जर तुम्ही देखील iPhone 14 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही सर्वात चांगली संधी ठरू शकते. कारण या मॉडेलवर आता चांगला डिस्काउंट दिला जात आहे. विशेष म्हणजे iPhone 14 ची किंमत कमी होऊन अँड्रॉइड पेक्षा कमी झाली आहे.

Apple iPhone 14 चा १२८जीबी स्टोरेज मॉडेल तुम्ही फ्लिपकार्टवरून ऑर्डर करू शकता. या फोनची एमआरपी ६९,९०० रुपये आहे परंतु हा फोन इथे १८ टक्के डिस्काउंटसह लिस्ट करण्यात आला आहे. त्यामुळे आता हा आयफोन ५६,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. परंतु हा डिस्काउंट यावरच थांबत नाही, तर ग्राहकांना अनेक बँक ऑफर्स देखील दिल्या जात आहेत. बँक ऑफ बरोडाच्या कार्डने EMI ट्रँजॅक्शन केल्यास १० टक्के डिस्काउंट मिळू शकतो. यासाठी मर्यादा १५०० रुपयांपर्यंत आहे.
हे देखील वाचा: पाण्यात पडलेला iPhone तांदळाच्या पिशिवीत ठेवू नका; Apple ने दिली वॉर्निंग

CITI Credit Card EMI Transaction वर देखील थेट १० टक्क्यांची सूट दिली जात आहे. एक्सचेंज ऑफर नंतर हा फोन तुम्हाला आणखी स्वस्तात मिळू शकतो. जुना फोन फ्लिपकार्टला परत दिल्यास ४४ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळू शकतो. परंतु यासाठी तुमच्या जुन्या फोनची कंडिशन चांगली असावी आणि तुमच्या जुन्या फोनच्या मॉडेल नंबरवर देखील ही सूट अवलंबून असेल. जर तुम्हाला हा डिस्काउंट मिळाला तर iPhone 14 १३ हजारांपेक्षा स्वस्तात खरेदी करता येईल.

iPhone 14 चे स्पेसिफिकेशन्स

एक वर्ष जुन्या फोनचे स्पेसिफिकेशन पाहता ह्यात ६.१ इंचाचा Super Retina XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. ड्युअल कॅमेरा सेटअप देखील मिळतो ज्यात १२ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि १२ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर मिळतो. फ्रंट कॅमेरा देखील १२ मेगापिक्सलचा आहे. प्रोसेसर पाहता फोनमध्ये ए१५ Bionic Chip मिळते म्हणजे फोनच्या स्पीडची जास्त चिंता करण्याची गरज नाही. फोनच्या बॅटरी आणि रॅमची माहिती अ‍ॅप्पल अधिकृतपणे देत नाही.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.