Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

१००० रुपयांनी कमी झाली Redmi 13C स्मार्टफोनची किंमत, आता खरेदी करा ८ हजारांच्या आत

9

शाओमी रेडमीनं गेल्यावर्षी भारतीय बाजारात आपला लो बजेट स्मार्टफोन Redmi 13C भारतात लाँच केला होता. हा मोबाइल 5G आणि 4G दोन मॉडेल्स मध्ये आला होता. आता कंपनीनं यातील रेडमी १३सी ४जीच्या किंमतीत कपात केली आहे. ब्रँडने या फोनच्या 4GB RAM व्हेरिएंटची किंमत १,००० रुपयांनी कमी केली आहे. Redmi 13C 4G च्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Redmi 13C ची किंमत

रेडमी १३सी भारतीय बाजारात तीन व्हेरिएंट्समध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. याचा 4GB RAM + 128GB Storage व्हेरिएंट ८,९९९ रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता जो आता ७,९९९ रुपयांमध्ये विकत घेता येईल. या व्हेरिएंटची किंमत १,००० रुपयांनी कमी झाली आहे. तसेच आता 6GB RAM + 128GB Storage तुम्ही ९,९९९ रुपये आणि 8GB RAM + 128GB Storage ची किंमत ११,४९९ रुपयांमध्ये मिळेल. हा फोन Stardust Black, Starfrost White आणि Starshine Green कलरमध्ये उपलब्ध आहे.
हे देखील वाचा:

Redmi 13C स्पेसिफिकेशन्स

रेडमी १३सी ४जी फोनमध्ये ६.७४ इंचाचा एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन डिस्प्ले ९०हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालतो तसेच ६००निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. स्क्रीनला कोर्निंग गोरिल्ला ग्लास ३ चे प्रोटेक्शन मिळते. पावर बॅकअपसाठी रेडमी १३सी ४जी स्मार्टफोन ५,०००एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. यात १८वॉट फास्ट चार्जिंग स्पीड देखील मिळतो.

Redmi 13C 4G फोनमध्ये प्रोसेसिंगसाठी १२नॅनोमीटर फॅब्रिकेशन वर बनलेला मीडियाटेक हीलियो जी८५ चिपसेट देण्यात आला आहे. हा ऑक्टाकोर प्रोसेसर आहे जो २.०गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीड वर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी फोनमध्ये माली-जी५२ जीपीयू आहे. हा रेडमी फोन अँड्रॉइड १३ आधारित मीयुआय १४ वर चालतो.

Redmi 13C च्या बॅक पॅनलवर एफ/१.८ अपर्चर असलेला ५० मेगापिक्सलचा मेन सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर एफ/२.४ अपर्चर असलेली २ मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स तसेच एक एआय सेन्सर देखील आहे. सेल्फी आणि विडिओ कॉलिंगसाठी हा रेडमी फोन एफ/२.० अपर्चर असलेल्या ८ मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.