Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

तिला नाही समजली म्हणून काय झालं ‘या’ फोनला समजेल तुमच्या नजरेची भाषा; आय ट्रॅकिंगसह Honor Magic 6 Pro लाँच

8

सध्या बार्सिलोना येथे सुरु असलेल्या Mobile World Congress (MWC 2024) मध्ये चायनीज स्मार्टफोन निर्माता Honor नं आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन Honor Magic 6 Pro लाँच केला आहे. यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) फीचर्ससह snapdragon 8 Gen 3 चिपसेट देण्यात आला आहे. यात स्मार्टफोनमध्ये आय-ट्रॅकिंग एआय फिचर देखील देण्यात आलं आहे. ज्याच्या मदतीनं युजर्स फक्त फोन स्क्रीनवर पाहून त्यांची कार लॉक आणि अनलॉक करू शकतात.

Eye Tracking AI Feature

Honor Magic 6 Pro मधील एआय फिचरवर कंपनीनं सर्वाधिक भर दिला आहे. ऑनर म्हटलं आहे की गेल्यावर्षी कंपनीनं टीज केलेलं एआय आधारित आय ट्रॅकिंग फिचर लवकरच फोनमध्ये येईल. कंपनीनं दावा केला आहे की हे फिचर तुमची नजर नोटिफिकेशन बारवर आहे की नाही ते ओळखेल आणि संबंधित अ‍ॅप ओपन करेल, यासाठी तुम्हाला तुमचे हात वापरण्याची गरज नाही. आता जाणून बुजून पाहणं आणि सहज टाकलेली नजर यातील फरक हा फोन कसा ओळखेल हे पाहावं लागेल.

इतर एआय आधारित फिचरयामध्ये “Magic Portal” चा समावेश आहे. जे तुमच्या मेसेजमधील इव्हेंट्स, पत्ते सहज ओळखेल आणि संबंधित मॅप किंवा कॅलेंडरमध्ये त्याचा समावेश करेल. तसेच तुमच्या फोटोज आणि दिलेल्या टेक्स्ट प्रॉम्प्टमधून व्हिडीओ बनवणाऱ्या एअरवर देखील कंपनीनं काम करत आहे.

Honor Magic 6 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Honor Magic 6 Pro मध्ये स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ चिपसेटवर चालतो, यात अँड्रॉइड १४ आधारित मॅजिक ओएस ८ आहे. सोबत १६जीबी पर्यंत रॅम आणि १टीबी पर्यंतची स्टोरेज आहे. फोनमध्ये ६.८ इंचाचा फुलएचडी+ एलटीपीओ अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळतो, जो १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीनं यात ५,६०० एमएएचची मोठी बॅटरी दिली आहे जी ८० वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ऑनर मॅजिक ६ प्रो मध्ये आयपी६८ रेटिंग देण्यात आली आहे.

फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा ओआयएस सपोर्टसह येतो. सोबत ५० मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि १८० मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा आहे जो ओआयएस आणि २.५एक्स ऑप्टिकल झूमला सपोर्ट करतो. तर फ्रंटला ५०मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Honor Magic 6 Pro ची किंमत

Honor Magic 6 Pro स्मार्टफोन १२जीबी रॅम व ५१२जीबी स्टोरेजसह येतो, ज्याची किंमत १,२९९ युरो ठेवण्यात आली आहे, ही किंमत १,१६,६०० भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. हा फोन १ मार्च पासून विकला जाईल.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.