Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

तीन महिने टिकेल या फोनची बॅटरी! 28,000mAh Battery सह दणकट स्मार्टफोनची एंट्री

8

28,000mAh Battery असलेला फोन बाजारात आला आहे. हा मोबाइल टेक ब्रँड Energizer नं MWC 2024 च्या मंचावरून सादर केला आहे ज्याचे नाव P28K Smartphone आहे. फोनच्या नावातील २८के म्हणजे या फोनमधील २८ हजार एमएएच बॅटरी. दमदार बॅटरी सोबतच या मोबाइल फोनमध्ये 8GB RAM आणि IP69 Rating सारखे फीचर्स आहेत, ज्याची संपूर्ण माहिती तुम्ही पुढे वाचू शकतात.

Energizer P28K स्मार्टफोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे यातील मोठी बॅटरी. कंपनीचा दावा आहे की एकदा हा स्मार्टफोन फुल चार्ज केला तर सलग वापरला तरी देखील हा सहज एक आठवडा टिकेल. 28,000एमएएच बॅटरी असल्यामुळे हा फोन १२२ तासांचा टॉक टाइम देऊ शकतो, म्हणजे जवळपास ५ दिवस. तसेच फोनचा स्टॅन्डबाय टाइम २२५२ तास म्हणजे ९४ दिवस आहे. ९४ दिवस म्हणजे ३ महीने!

Energizer P28K ची किंमत

28,000एमएएच बॅटरी असलेला स्मार्टफोन ८जीबी रॅमसह २५६जीबी स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. हा मोबाइल सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये आला आहे ज्याची किंमत २४९.९९ यूरो आहे. ही किंमत भारतीय करंसीनुसार २२,४९९ रुपयांच्या आसपास आहे. ही कंपनी भारतीय बाजारात सक्रिय नाही, त्यामुळे Energizer P28K स्मार्टफोन सध्या भारतात सेलसाठी उपलब्ध होणार नाही.

Energizer P28K स्पेसिफिकेशन्स

मोठ्या बॅटरीसह या फोनमध्ये एलसीडी पॅनलवर बनलेली मोठी स्क्रीन देखील देण्यात आली आहे. एनर्जाइजर पी२८के स्मार्टफोन ६.७८ इंचाच्या डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे जो फुलएचडी+ पिक्सल रिजोल्यूशन वर चालतो.

Energizer P28K स्मार्टफोन लेटेस्ट अँड्रॉइड १४ ओएससह लाँच झाला आहे. प्रोसेसिंगसाठी या मोबाइल फोनमध्ये ६नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक हीलियो जी९९ ऑक्टाकोर प्रोसेसर आहे जो २.२गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो. ग्लोबल मार्केटमध्ये हा मोबाइल फोन सिंगल व्हेरिएंटमध्ये सादर झाला आहे. यात ८जीबी रॅमसह २५६जीबी स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर ६० मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, २० मेगापिक्सल सेकंडरी लेन्स तसेच २ मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी तसेच रील्स बनवण्यासाठी Energizer P28K स्मार्टफोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

एनर्जाइजर पी२८के मध्ये 28,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी यात ३३वॉट फास्ट चार्जिंग आहे. हा मोबाइल फोन IP69 रेटिंगसह मार्केटमध्ये आला आहे. हे सर्टिफिकेशन्स फक्त फोनची वॉटर प्रूफ आणि डस्ट प्रूफ क्षमता दर्शवत नाही तर उष्ण आणि थंड वातावरणात हा चालू शकतो हे देखील दर्शवते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.