Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

स्मार्टफोन नव्हे Smartwatch मध्ये मिळतोय 2GB RAM; वनप्लस पेक्षा स्वस्तात Xiaomi Watch 2 लाँच

8

Xiaomi नं MWC 2024 च्या मंचावरून Xiaomi Watch 2 स्मार्टवॉच लाँच केलं आहे, याआधी कंपनीनं Xiaomi Watch S3 स्मार्टवॉच देखील सादर केलं होतं. Wear OS वर चालणाऱ्या या स्मार्टवॉचमध्ये क्वॉलकॉम चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. शाओमीच्या वियरेबलमध्ये वर्तुळाकार डिस्प्ले देण्यात आला आहे सोबत अ‍ॅल्युमिनियम अलॉय फ्रेम देण्यात आली आहे. यातील ड्युअल बँड एल१ + एल५ जीएनएसएस बर्फाळ प्रदेशात देखील अचूक लोकेशन सांगण्यास मदत करतात. तसेच यात नवीन आणि अपग्रेडेड १२ चॅनेल हार्ट रेट मॉनिटरिंग मोड्यूल सेन्सर देण्यात आला आहे.

Xiaomi Watch 2 ची किंमत

Xiaomi Watch 2 ची किंमत १९९ युरो ठेवण्यात आली आहे, ही किंमत सुमारे १७,८७० भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. हे वॉच ब्लॅक आणि सिल्व्हर कलरमध्ये उपलब्ध झालं आहे. याची विक्री काही देशांमध्ये सुरु झाली असून लवकरच इतर देशांमध्ये हे उपलब्ध होईल. युरोपियन किंमत भारतात लागू झाली तर हे वॉच वनप्लस वॉच २ पेक्षा स्वस्तात उपलब्ध होईल.
हे देखील वाचा: सिंगल चार्जवर १०० तास चालेल हे स्मार्टवॉच; इतकी आहे OnePlus Watch 2 ची किंमत

Xiaomi Watch 2 चे फीचर्स

शाओमी वॉच २ मध्ये १.४३ इंचाचा वर्तुळाकार अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे रिजोल्यूशन ४६६x४६६ पिक्सल आहे. हा एक टच स्क्रीन डिस्प्ले आहे जो ६०० नीट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. शाओमीच्या याचा स्मार्टवॉचमध्ये ४ नॅनोमीटर प्रोसेसवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन डब्लू५+ जेन १ चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. या वियरेबलमध्ये २जीबी रॅम व ३२जीबी स्टोरेज देण्यात आली आहे.

Xiaomi Watch 2 मध्ये गुगलची खास वियरेबल डिवाइससाठी बनलेली WearOS ही ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. तसेच यात एक ऑप्टिकल हार्ट रेट सेन्सर, अँबीयंट लाइट सेन्सर, इलेक्ट्रॉनिक कंपास सेन्सर आणि बॅरोमीटर सेन्सर मिळतो. या स्मार्टवॉचमध्ये १५० पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. तसेच हे झोप, ब्लड ऑक्सिजन लेव्हल आणि इतर अनेक हेल्थ मेट्रिक्स ट्रॅक करू शकतं.
हे स्मार्टवॉच वॉटर रेजिस्टंट डिजाइनसह बाजारात आलं आहे. यात ४९५ एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी सिंगल चार्जमध्ये ६५ तासांचा बॅकअप देते, असा दावा कंपनीनं केला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.