Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
iPhone 13 वरील फ्लिपकार्टची एक्सचेंज डील
सध्या आयफोन १३ चा १२८ जीबी स्टोरेज असलेलं मॉडेल फ्लिपकार्टवर ५२,९९९ रुपयांमध्ये विकला जात आहे. परंतु जर तुम्ही आयफोन १३ (१२८जीबी) विकत घेण्यासाठी आयफोन १२ एक्सचेंज केल्यास तुम्हाला ३१,९५३ रुपयांचा डिस्काउंट मिळेल. त्यामुळे हा फोन २८,०९७ रुपयांना सहज उपलब्ध होईल.
हे देखील वाचा:
iPhone 13 चे स्पेसिफिकेशन
iPhone 13 मध्ये ६.१ इंचाचा सुपर रेटीना एक्सडीआर डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ह्याचा मुख्य मेन कॅमेरा १२ मेगापिक्सलचा आहे. तसेच १२ मेगापिक्सलचा आणखी एक कॅमेरा मिळतो. तर फ्रंटला १२ मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. चिपसेट म्हणून फोनमध्ये A15 Bionic चा वापर करण्यात आला आहे. जो कंपनीचा दमदार प्रोसेसर आहे.
आयफोन १६ सीरिजमध्ये गोल्ड कलर
गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या आयफोन १५ सीरीजचे फ्लॅगशिप स्मार्टफोन्स टायटेनियम फ्रेम मध्ये सादर करण्यात आले होते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X चे युजर Majin Bu (@majinbuofficial) नं दोन डिजाइन शेयर केल्या आहेत, हे नवीन कलर्स मधील आयफोन १६ प्रो वाटत आहेत. कंपनीच्या नवीन प्रीमियम आयफोन मॉडेल्स Desert Titanium आणि Titanium Grey मध्ये लाँच केला जाऊ शकतो. नवीन डेजर्ट टायटेनियम (डेजर्ट येलो) कलर आयफोन १६ प्रो मॉडेल्स मधील गोल्ड कलर आहे. गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या आयफोन १५ सीरीजचे प्रो मॉडेल्स गोल्ड फिनिशमध्ये उपलब्ध झाले नव्हते. टिप्सटरने दिलेली माहिती खरी ठरल्यास आयफोन १६ प्रो द्वारे कंपनीच्या प्रीमियम स्मार्टफोन्समध्ये गोल्ड कलरचे पुनरागमन होऊ शकते.