Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Truecaller ने आणले नवे कॉल रेकॉर्डिंग फीचर; भारतात केले लाँच

9

कॉलर आयडी ॲप Truecaller ने भारतातील स्मार्टफोनसाठी AI पॉवर कॉल रेकॉर्डिंग आणि ट्रान्सक्रिप्शन अशी नवीन फीचर्स सादर केली आहेत. याच्या मदतीने अँड्रॉईड आणि आयओएस दोन्ही यूजर्स त्यांच्या स्मार्टफोनवर कॉल रेकॉर्ड करू शकतील. यासोबतच त्यांना AI च्या मदतीने ट्रान्स्क्राईब (कॉपी) करण्याची सुविधाही मिळेल. गेल्या वर्षी Truecaller ने ही सुविधा अमेरिकेत उपलब्ध करून दिली होती.

फीचर्स केवळ ॲपच्या युजर्ससाठी

ही फीचर्स केवळ या ॲपच्या युजर्ससाठी असतील. Truecaller ने सांगितले की, याद्वारे युजर्स डायरेक्ट ॲपमध्ये कॉल रेकॉर्ड करू शकतील आणि यासाठी त्यांना कोणत्याही थर्ड-पार्टी ॲपची आवश्यकता नाही. AI ट्रान्सक्रिप्शनच्या सुविधेमुळे रेकॉर्ड केलेल्या कॉलचे ट्रान्सक्रिप्शन उपलब्ध होईल. याआधीही Truecaller ने युजर्सना कॉल रेकॉर्डिंगची सुविधा दिली होती पण गुगलने निर्बंध लादल्यानंतर ती बंद करावी लागली होती.

स्पॅम कॉल्सला आळा

गेल्या वर्षी, Truecaller ने मेसेजिंगसाठी जगभरात लोकप्रिय असलेल्या WhatsApp वरही कॉलर आयडेंटिटी सेवा सुरू केली होती. यामुळे युजर्सना इंटरनेटवरील स्पॅम कॉल टाळणे सोपे होते. Truecaller च्या अहवालानुसार , भारतासह अनेक देशांमध्ये स्पॅम आणि टेलिमार्केटिंग कॉलचे प्रमाण वाढले आहे. देशातील युजर्सना दर महिन्याला सरासरी 18 स्पॅम कॉल येतात. देशाच्या दूरसंचार नियामकाने रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल सारख्या दूरसंचार कंपन्यांना त्यांच्या नेटवर्कवर AI फिल्टर वापरून टेलिमार्केटिंग कॉलला आळा घालण्याचे निर्देश दिले होते. तेंव्हा यासंबंधी टेलिकॉम कंपन्यांशीही चर्चा सुरु असल्याचे Truecaller ने म्हटले आहे.

स्थानिक भाषांत सेवा

Truecaller चे ट्रान्सक्रिप्शन सध्या इंग्रजी आणि हिंदी भाषांना सपोर्ट करते. भविष्यात यात अनेक स्थानिक भाषा जोडल्या जाणार असल्याचे Truecaller ने सांगितले आहे.

Truecaller फीचरचे दर

या सेवेचे प्रीमियम पॅकेज 75 रुपये महिना किंवा वार्षिक 529 रुपये असे असेल. या सशुल्क सेवेमधये तुम्हाला कॉल रेकॉर्डिंग आणि प्रीमियमचे इतर फायदे जसे, कॉन्टॅक्ट रिक्वेस्ट , जुन्या कॉल्सची हिस्टरी आणि बरेच काही मिळेल .

कॉल व मीटिंग कॅप्चर करणे होणार सोपे

iPhone वर हे फीचर Truecaller ॲपमध्ये सातत्याने काम करते. कॉल करतांना किंवा रिसिव्ह करतांना, सर्चमध्ये “कॉल रेकॉर्ड ” वर टॅप करा. हे Truecaller ची रेकॉर्डिंग लाइन डायल करेल आणि तुम्हाला कॉल एकत्र मर्ज (विलीन) करण्याचा ऑप्शन देईल . ट्रान्सक्रिप्शन पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक सूचना मिळेल. सर्व रेकॉर्डिंग्स तुमच्या डिव्हाइसवर स्थानिक पातळीवर स्टोअर केल्या जातील.

Android युजर्सना Truecaller च्या डायलरमध्ये एक रेकॉर्ड बटण मिळेल. तुमच्या महत्त्वाच्या फोन मीटिंग्ज कॅप्चर करणे सुरू करण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी फक्त एक टॅप करावे लागेल.

Truecaller चा भारतातील व्यवसाय

स्टॉकहोम, स्वीडन येथे मुख्यालय असलेल्या Truecaller कंपनीने स्वीडनच्या बाहेर बेंगळुरू येथे पहिले ऑफिस उघडले. या कंपनीने सुमारे दशकभरापूर्वी भारतात आपला व्यवसाय सुरू केला. या कार्यालयाची क्षमता सुमारे 250 कामगारांची आहे. त्यात आधुनिक तंत्रज्ञान आणि सुविधा उपलब्ध आहेत. Truecaller चे सुमारे 35 कोटी वापरकर्ते आहेत आणि त्यापैकी सुमारे 25 कोटी वापरकर्ते भारतातील आहेत. तेंव्हा नवीन उत्पादने आणि सेवा लाँच करण्यासाठी भारतात अनोख्या संधी असल्याचे Truecaller ने आपल्या प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.