Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
OPPO F25 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स
OPPO F25 Pro 5G मध्ये ६.७ इंचाचा Full HD+ अॅमोलेड डिस्प्ले मिळत आहे. ही स्क्रीन १२०Hz रिफ्रेश रेट, २४१२ x १०८० पिक्सल रिजॉल्यूशन, २४०हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट, ११०० निट्स पीक ब्राइटनेस ९३.४% स्क्रीन टू बॉडी रेश्यो आणि ३९४ पीपीआय पिक्सल डेंसिटी सारख्या अनेक फीचर्सना सपोर्ट करते. ओप्पो एफ२५ प्रो ५जी मोबाइलमध्ये अँड्रॉइड १४ आधारित कलरओएस १४ वर चालतो.
हे देखील वाचा:
ओप्पो एफ२५ प्रो ५जी मध्ये ब्रँडनं MediaTek Dimensity 7050 चिपसेटचा वापर केला आहे. हा चिपसेट परफॉरमेंस देतो. याचा हाय क्लॉकस्पीड २.६गिगाहर्ट्झ पर्यंत आहे. त्याचबरोबर ग्राफिक्ससाठी ARM Mali G68 MC4 GPU मिळतो. ओप्पो एफ२५ प्रो ५जी मोबाइल डेटा स्टोर करण्यासाठी 8GB LPDDR4X RAM सोबत 256GB पर्यंत UFS ३.१ इंटरनल स्टोरेज आहे. डिव्हाइसमध्ये एक्सटेंटेड ८जीबी रॅम आणि स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रो एसडी कार्ड स्लॉट मिळतो. ज्याच्या मदतीनं २टीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येईल.
ओप्पो एफ२५ प्रो ५जी मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप कॅमेरा आहे. जो खास ६४एमपीचा ओव्ही६४बी प्रायमरी, ८एमपीचा सोनी आयएमएक्स३५५ अल्ट्रावाइड लेन्स आणि २एमपी मॅक्रो सेन्सर असलेला आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ३२एमपीचा कॅमेरा आहे.
ओप्पो एफ२५ प्रो ५जी मध्ये ५०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर ही चार्ज करण्यासाठी ६७वॉट सुपरवुक फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळत आहे. डिवाइस आयपी६५ रेटिंगसह बाजारात आला आहे. म्हणजे की हा धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहतो. त्याचबरोबर इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, फेस अनलॉक फीचर देखील मिळते.
OPPO F25 Pro 5G ची किंमत आणि उपलब्धता
कंपनीनं नवीन स्मार्टफोन OPPO F25 Pro 5G दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये बाजारात आणला आहे. हा भारतात Flipkart, Amazon आणि OPPO स्टोरच्या माध्यमातून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. फोनच्या ८जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत २३,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. तर डिवाइसच्या ८जीबी रॅम व २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत २५,९९९ रुपये आहे.
कलर ऑप्शन पाहता फोन लावा रेड आवर आणि ओसियन ब्लू सारखे दोन कलर ऑप्शनमध्ये सादर झाला आहे. मोबाइलची प्री-ऑर्डर आज म्हणजे २९ फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे. तर याची विक्री ५ मार्चपासून सुरु होईल. लाँच ऑफर पाहता एसबीआय आणि आयसीआयसीआय बँक कार्डने फोन घेतल्यास २,००० रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट दिला जाईल.