Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

१० हजारांच्या आत आला Nokia चा नवा 5G Phone; पुढील आठवड्यात सुरु होईल विक्री

12

Nokia G42 5G चा नवीन व्हेरिएंट एचएमडी ग्लोबलनं सादर केला आहे. याचा पहिला सेल ८ मार्च २०२४ ला महिला दिनाच्या दिवशी भारतात होणार आहे. Nokia G42 5G मध्ये ६.५६ इंचाचा एचडी+ डिस्‍प्‍ले, ५० मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि ५०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. इथे आम्ही तुम्हाला Nokia G42 5G च्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची माहिती दिली आहे.

Nokia G42 5G ची किंमत

Nokia G42 5G चा नवा ४जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत ९,९९९ रुपये आहे. जो ८ मार्च, २०२४ पासून विकला जाईल. तर फोनच्या ८जीबी रॅम व २५६जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १६,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. ६जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १२,५९९ रुपये आहे. नोकिया जी४२ ५जी Grey, Purple आणि Pink कलरमध्ये उपलब्ध आहे.
हे देखील वाचा: अत्यंत कमी किंमतीत आला 16GB RAM असलेला फोन; Nokia G42 5G सोबत ब्लूटूथ हेडफोन मोफत

Nokia G42 5G चे स्पेसिफिकेशन्स

नोकिया जी४२ ५जी फोनमध्ये ६.५६ इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. वॉटरड्रॉप नॉच डिजाईनसह येणार हा एलसीडी पॅनल ९०हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. हा मोबाइल फोन अँड्रॉइड १३ ओएसवर लाँच झाला आहे. ह्यात प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४८० प्लस ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी Nokia G42 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आहे. ह्यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, २ मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. तर फ्रंट पॅनलवर सेल्फी आणि विडीएओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

डिवाइसमध्ये ५,०००एमएएचची बॅटरी आहे जी जबरदस्त पावर बॅकअपसाठी देऊ शकते. हा फोन २०वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. Nokia G42 5G मध्ये ड्युअल सिम ५जी आणि ४जी ला सपोर्ट करतो. तसेच सिक्योरिटीसाठी यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. हा हँडसेट OZO प्लेबॅक ऑडियो फीचर्ससह बाजारात आला आहे. तर वायफाय आणि ब्लूटूथ सारखे कनेक्टिव्हिटी फिचर देखील यात मिळतात.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.