Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नुतन पोलिस अधीक्षकांचा वाळु माफीयांना दणका,अवैध वाळुसह केला 1 कोटींचा मुद्देमाल जप्त…

9

चंद्रपूर पोलिसांची मोठी कारवाई; अवैध रेतीसह केला 1 कोटींचा मुद्देमाल जप्त..

चंद्रपूर (प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, गांजा तस्करी विक्री, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस अधीक्षकांनी संबंधित सर्व पोलिस अधिकाऱ्यांना गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. या मध्ये जास्त प्रमाणांत रेतीचे(वाळुचे)अवैधरित्या उत्खनन, वाहतुक-विक्री सुरू आहे. असे समजल्यावर या प्रकारावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला होता. म्हणून त्याअनुषंगाने कोरपणा पोलिसांचे पथक हे कारवाईसाठी गस्तीस असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन नारंडा फाटा बसस्टॉप समोर सापळा रचुन अवैध रेती(वाळु)चोरी करून वाहतुक करणारे 04 हायवा वाहन जप्त करून 1 कोटी 83 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी आरोपी नामे  संजय निवृत्ती देवकाते, (वय 50 वर्षे), रा. पल्लेझरी, ता. जिवती,जि.चंद्रपूर, अंबादास राजु आत्राम, (वय 30 वर्षे), रा.अंबेझरी, ता.जिवती, जि. चंद्रपूर, सुरज प्रभाकर कुमरे, (वय 28 वर्षे), रा.लाठी, ता.गोंडपिपरी, जि.चंद्रपूर, अशोक धर्मराज राठोड, (वय 26 वर्षे), रा.पाटण, ता.जिवती,जि.चंद्रपूर, सदाम वजिर शेख, रा.शेणगाव, ता.जिवती, जि.चंद्रपूर आणि सचिन भोयर रा. गडचांदूर, ता.कोरपणा, जि.चंद्रपूर यांचेवर कोरपणा पोलिस ठाण्यात अप. क्र. 40/2024   कलम 379,34 भादवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन खालील मुद्देमाल

1) कि.अं. 50,80,000/- वाहन क्र. MH-34-BG-9520 मध्ये अंदाजे 08 ब्रास रेती कि.अं. 80,000/- रूपये व हायवा (ट्रक) कि.अं 50,0,000 एकुण 50,80,000/रू.

2) कि.अं 50,80,000/- वाहन क्र.MH-34-82-0221 मध्ये अंदाजे 08 रेती. अं.किं. 80,000/-रूपये व हायवा (ट्रक) कि.अं 50,0,000 असा एकुण 50,80,000/रू.

3) कि.अं 50,80,000/- वाहन क्र. MH-34-BZ- 5773 मध्ये अंदाजे 08 ब्रास रेती कि.अ. 80,000/-रू. व हायवा (ट्रक) कि.अं 50,00,000 असा एकुण 50,80,000/रू.

4) कि.अं 30,80,000/- वाहन क्र.MH-34-BZ-9310 मध्ये अंदाजे 08 ब्रास रेती कि. अं. 80,000/-रूपये व हायवा (ट्रक) कि.अं 30,0,000 असा एकुण 50,80,000/रू. मुद्देमाल, असा एकुण 1,83,20,000/- रु.

जप्त करण्यात आला आहे. वर नमुद अवैध चोरीची रेती वाहतुक करणारे वाहनचालक व मालक यांच्यावर अप.क.40/2024 कलम 379,34 भादवी अन्वये गुन्हा नोंद करून जप्त मुद्देमाल व 05 आरोपीत इसमांना पो.स्टे. कोरपणा यांच्या ताब्यात पुढील कार्यवाही साठी देण्यात आले आहे.

अशा प्रकारे सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक, चंद्रपूर एम.सुदर्शन, अप्पर पोलिस अधिक्षक रिना जनबंधु, महेश कोडावार पोलिस निरिक्षक, स्थागुशा चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली वर नमुद अधिकारी व अंमलदार यांनी पार पाडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.