Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

ViewSonic PX749-4K प्रोजेक्टर भारतात लाँच; जाणून घ्या किंमत

6

ViewSonic या मल्टिनॅशनल इलेक्ट्रॉनिक कंपनीनेने भारतात ‘PX749-4K’ प्रोजेक्टर सादर केला आहे, या प्रोजेक्टरच्या साथीने घरातील मनोरंजनाचा अनुभव वाढवण्याचा कंपनीचा उद्देश आहे . सोनिकच्या PX मालिकेतील हे नवीन गॅझेट ग्राहकांना अत्याधुनिक फीचर्स देणार आहे, तेही त्यांना परवडणाऱ्या किमतीत. उच्च-गुणवत्तेचे 4K व्ह्यूइंग आणि गेमिंग ग्राहकांना उत्तम अनुभव देणार असल्याचा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

गेमिंगचा लार्ज स्क्रीन ट्रेंड

ज्याप्रकारे घरातील मनोरंजन अल्ट्रा लार्ज-स्क्रीन मूव्ही आणि व्हिडिओ स्ट्रीमिंगसाठी प्रोजेक्टरकडे वळत आहे, त्याचप्रकारे वैयक्तिक गेमिंग देखील त्याच ट्रेंडला फॉलो करेल यावर ViewSonic विश्वास ठेवतो. गेमर्सची मोठ्या-स्क्रीनची मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनीने गेल्यावर्षी आपला पहिला गेमिंग प्रोजेक्टर लॉन्च केला होता. आता ‘PX748-4K’ मॉडेलच्या जागी, ‘PX749-4K’ हा अधिक उत्तम अनुभव देण्यासाठी सज्ज आहे.

मुव्ही व गेमिंग लव्हर्ससाठी ॲडव्हान्स फीचर्स

‘PX748-4K’ मॉडेलच्या जागी, ‘PX749-4K’ त्याच्या प्रगत फीचर्ससह ‘इमर्सिव होम थिएटर’ अनुभव देणार आहे .आकर्षक 4K रिझोल्यूशनमुळे हा प्रोजेक्टर मुव्ही व गेमिंग लव्हर्ससाठी आकर्षक व्हिज्युअल आणि Xbox गेमिंग कन्सोलसह अखंड सुसंगतता ऑफर करतो.

गेमिंग प्रेमींसाठी, PX749-4K प्रभावी फीचर्स ऑफर करतो. 4.2ms अल्ट्रा-फास्ट इनपुट आणि 240Hz रीफ्रेश रेट स्मूद आणि रिस्पॉन्सिव्ह गेमप्ले देतो. याव्यतिरिक्त, प्रोजेक्टरकडे “Designed for Xbox” प्रमाणपत्र आहे. यात ‘हार्मन कार्डन स्पीकर’ (Harman Kardon speaker ) सिस्टीमचा समावेश आहे, जे संपूर्ण गेमिंग वातावरण वाढवण्यासाठी इमर्सिव्ह ऑडिओ प्रदान करते.

सुलभ कनेक्टिव्हिटी आणि इन्स्टॉलेशन

कनेक्टिव्हिटी आणि इन्स्टॉलेशन फ्लेक्सिबिलिटीच्या बाबतीत, ‘PX749-4K’ विविध पर्यायांची श्रेणी देते. HDMI 2.0 आणि USB-A सह एकाधिक कनेक्टिव्हिटी पोर्टसह, युजर्स त्यांचे डिव्हाइस आणि पेरिफेरल्स सहजपणे कनेक्ट करू शकतात. शिवाय, प्रोजेक्टरमध्ये 1.3x ऑप्टिकल झूम आणि साइड प्रोजेक्शन क्षमता आहेत, ज्यामुळे फ्लेक्सिबल इंस्टॉलेशन आणि मोठ्या 300″ स्क्रीन आकाराची निर्मिती करण्याची परवानगी मिळते. यामुळे जागेची कमतरताअसली तरी इमर्सिव्ह (भव्य दृश्य अनुभव) पाहण्याचा अनुभव मिळतो .शिवाय, ‘PX749-4K’ हे स्मार्ट होम सेटअपमध्ये सहजरित्या अटॅच होते.

काय आहे किंमत

2,90,000 रुपयांची किंमत असलेला, ‘ViewSonic PX749-4K’ प्रोजेक्टर आता संपूर्ण भारतात खरेदीसाठी उपलब्ध आहे. या लॉन्चसह,भारतीय ग्राहकांना प्रगत व्हिज्युअल सोल्यूशन्समध्ये एन्ट्री देणे हे ViewSonic चे उद्दिष्ट आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.