Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
वर्धा (शहर) हद्दीतील कुख्यात गुंडावर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…
वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन वर्धा (शहर) हद्दीतील स्टेशन फैल, वर्धा परीसरातील कुख्यात गुंड शादाब मुख्त्यार खान पठाण, वय २७ वर्ष, रा. स्टेशन फैल, वर्धा याचेविरुध्द पोलिस स्टेशन वर्धा (शहर) तसेच सावंगी (मेघे) चे
अभिलेखावर शरीराविरुध्द तसेच मालमत्तेविरुध्द एकुण १४ गुन्हे नोंद आहे. ज्यामध्ये घातक शस्त्रासह दरोडा घालणे, दुखापत, गंभिर दुखापत, शासकीय वाहनांची तोडफोड करणे, गैरकायद्याची मंडळी गोळा करुन हल्ला करणे अशा प्रकारचे गुन्हे नोंद आहेत. आणि सतत गुन्हे करण्याच्या सवईचा गुन्हेगार होता. सर्व गुन्हे न्यायप्रविष्ठ आहेत. मागील ४ ते ५ वर्षापासुन स्थानबध्द शादाब मुख्त्यार खान पठाण हा बोरगाव (मेघे), स्टेशन फैल, दयाल नगर, गणेश नगर परीसरात जनसामान्यांच्या मनामध्ये स्वतःची आणि टोळीच्या मदतीने प्रचंड दहशत निर्माण केली होती. त्याच्या दहशतीमुळे अनेक पिडीत त्याचे विरुध्द पोलिस स्टेशनला तक्रार देण्यास सुध्दा धजावत नव्हते. त्यामुळे परीसरातील सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था भंग होवुन सार्वजनीक जिवन विस्कळीत झाले होते.
आज पासुन १ वर्षापुर्वी नुरी मस्जीद, स्टेशन फैल जवळ दोन गटामधील वर्चस्वाच्या संघर्षातुन गोळीबाराची घटना घडली होती. सदर गुन्हेगार हा त्यापैकी एका टोळीतील सदस्य होता. शादाब मुख्त्यार खान पठाण, स्टेशन फैल, वर्धा याच्या कृत्यांमुळे पोलिस स्टेशन वर्धा (शहर) अंतर्गत येणाऱ्या परीसरामध्ये सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था भंग होत असल्याने त्याचेविरुध्द सन २०१८ मध्ये मोक्का, तडीपार यासारख्या प्रतिबंधात्मक कार्यवाही
करण्यात आल्या होत्या. परंतु अशा प्रतीबंधक कार्यवाहीस सुध्दा तो जुमानत नसल्याचे निदर्शनास आले. त्या अनुषंगाने ठाणेदार वर्धा (शहर) यांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हाथभट्टीवाले, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, रेती माफीया व जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ (सुधारणा २०१५) अन्वये स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. राहुल कर्डीले,
जिल्हादंडाधिकारी, वर्धा यांना नूरुल हसन पोलिस अधीक्षक, वर्धा यांचे मार्फतीने सादर केला होता.
सदर स्थानबध्द हा गुंड प्रवृत्तीचा आणि सातत्याने करीत असलेल्या गुन्ह्यांची मा. जिल्हादंडाधिकारी यांनी गांर्भीयाने दखल घेवुन शादाब मुख्त्यार खान पठाण, वय २७ वर्ष, रा. स्टेशन फैल, वर्धा याचे विरुध्द दिनांक ०१.०३.२०२४ रोजी स्थानबध्द आदेश जारी केल्याने त्यास नागपूर जिल्हा मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे स्थानबध्द करण्यात आले आहे.
मागील १ वर्षातील कालावधीमध्ये पोलिस विभाग व महसुल विभाग यांचेमधील योग्य समन्वयामुळे एम.पी.डी.ए. कायद्यान्वये धडक कार्यवाही करण्यात आलेली आहे. वर्धा जिल्ह्यातील शरीराविरुध्दचे गुन्हे करणारे गुन्हेगार, दारुविक्रेते, रेती माफीया अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या मनामध्ये धडकी भरलेली असुन गुन्हेगारी विश्वात पुढचा नंबर कुणाचा लागेल या भितीने चांगलीच दहशत निर्माण झालेली असुन गुन्हेगारांमध्ये चर्चा रंगत असल्याचे दिसुन येते. उपरोक्त कायद्यान्वये कठोर प्रभावी कार्यवाही करण्याचे पुनःश्च संकेत मा. जिल्हादंडाधिकारी, वर्धा तसेच पोलिस अधीक्षक, वर्धा यांनी दिलेले आहेत. सन २०२३ ते अद्यापपावेतो एकुण १२ दारुविक्रते तसेच गुंडगिरी करणाऱ्या इसमावर कार्यवाही करुन कारागृहात स्थानबध्द करण्यात आलेले आहे. एम.पी.डी.ए.कायद्यांतर्गत वर्धा जिल्ह्याच्या अभिलेखावरील आजवरची सर्वाधीक कार्यवाही करुन अशा गुन्हेगारांवर प्रतिबंध करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय गायकवाड स्था. गु. शा. वर्धा, तत्कालीन पोलिस निरीक्षक धनाजी जळक,सध्याचे पोलिस निरीक्षक रविन्द्र शिंदे, सफौ. संजय खल्लारकर, गिरीश कोरडे, अमोल आत्राम, स्था. गु. शा. वर्धा, तसेच पोलिस स्टेशन वर्धा (शहर), पोहवा. प्रदिप राऊत, नापोशि दिपक जंगले, यांनी केली.